पत्रकार विषयकपुरस्कारबार्शीमहाराष्ट्र

हर्षद लोहार यांना व्हॉईस ऑफ मीडियाचा उत्कृष्ट शहराध्यक्ष पुरस्कार प्रदान

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : दि २५ मे २०२४ रोजी व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अधिवेशन गरुड झेप अकॅडमी,नाशिक येथे संपन्न झाले.व्हॉईस ऑफ मीडिया गुजरातचे प्रदेश उपाध्यक्ष जिग्नेश जोशी यांच्या हस्ते व्हॉईस ऑफ मीडियाचे बार्शी शहराध्यक्ष हर्षद लोहार यांना पश्चिम महाराष्ट्र विभाग उत्कृष्ट शहराध्यक्ष म्हणून सन्मानित करण्यात आले.

हर्षद लोहार यांनी बार्शी शहराध्यक्ष म्हणून आजपर्यंत व्हॉईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान,पत्रकारांची रक्त तपासणी शिबीर,पत्रकार व त्यांच्या संपुर्ण कुटुंबासाठी भव्य आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन, युवकांनी भविष्यात पत्रकारितेत करियर करावं म्हणून मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन आदी उपक्रम राबविले आहेत.

दिल्ली येथील ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे, व्हॉईस ऑफ मीडिया चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा संस्थापक संदिप काळे यांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला.याप्रसंगी व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, प्रदेश कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर, प्रदेश उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ, प्राचार्य श्रीकांत सोनवणे हे उपस्थित होते. हर्षद लोहार यांचे व्हॉईस ऑफ मीडिया बार्शी शहर व तालुका पदाधिकारी व सदस्य तसेच साप्ताहिक,दैनिक व डिजिटल माध्यमातील सर्व पत्रकारांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button