बार्शीमहाराष्ट्रसामाजिक

झाडांचा वाढदिवस करून पर्यावरण दिन साजरा.वृक्ष संवर्धन समिती बार्शी चा उपक्रम.सयाजी शिंदे यांचा व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे सहभाग

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : 5 जून जागतिक पर्यावरण दिन तसेच वृक्ष संवर्धन समितीचा पाचव्या वर्धापन दिनानिमित्त मान्यवरांच्या उपस्थितीत झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. दोन वर्षांपूर्वी बार्शी तालुक्यातील शहीद झालेल्या जवानांच्या नावाने लावलेल्या झाडांच्या दुसऱ्या वाढदिवसला शहिदांचे नातेवाईक पण उपस्थितीत होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वडाचे एक झाड निवडण्यात आले होते.या वेळी रवी फाउंडेशनचे मधुकर डोईफोडे ,माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सुरवसे,हेल्थ क्लबचे भगवान लोकरे, जाणीव पोलीस सेवा संघ बार्शीचे कानडे पत्रकार गणेश गोडसे हॅप्पी क्लबचे बाप्पा कानगुडे प्राध्यापक शशिकांत धोत्रे एस आर एम अकॅडमीचे शेख सर हे प्रमुख म्हणून उपस्थित होते.

सिनेअभिनेते तसेच सह्याद्री देवराईचे अध्यक्ष वृक्षमित्र सयाजी शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे या कार्यक्रमात उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी वृक्ष संवर्धन समितीच्या कार्याचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी मधुकर डोईफोडे भगवान लोकरे संभाजी नवले मेजर मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.त्या परिसरातील सर्व झाडांना फुगे लावून सजावट करण्यात आली होती. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष उमेश काळे यांनी केले सूत्रसंचालन वीरेंद्र बंडे ,आभार डॉ. सचिन चव्हाण यांनी मानले. तर वृक्ष संवर्धनाची शपथ उदयकुमार पोतदार यांनी दिली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राणा देशमुख, राहुल तावरे,उमेश नलवडे, संतोषकुमार गायकवाड, सुधीर वाघमारे,सागर बिडवे, चंद्रकांत उलभगत,आनंद धुमाळ,महेश बकशेट्टी,अक्षय भोईटे, अमृत खेडकर, गणेश कदम,गणेश घोलप,अक्षय घोडके, अजित नडगिरे, चारूदत्त जगताप, हर्षद लोहार, सुनील फल्ले, सायरा मुल्ला, शेख सर, चंद्रकांत चोबे,सौदागर मुळे,बुगडे सर, डॉ.प्रशांत मांजरे, डॉ. प्रवीण मिरगणे डॉ. विजय पवार, डॉ. वासुदेव सावंत, माणिक हजारे, अनमोल वाघमारे, तेजस विधाते, सचिन थोरबोले यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button