बार्शीमहाराष्ट्र

मुंगशी विद्यालयाला मनोज जरांगे पाटील यांचे नाव शिक्षण महर्षी बाळासाहेब कोरके यांच्या जय जगदंबा शिक्षण संस्थेचा ठराव

B1न्यूज मराठी नेटवर्क

वैराग : बार्शी तालुक्यातील मुंगशी ( दहिटणे ) येथे १९९८ मध्ये जय जगदंबा शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी बाळासाहेब कोरके यांनी मुंगशी विद्यालयाची स्थापना केली. आज त्याच शाळेचे नाव बदलून शाळेला मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे – पाटील यांचे नाव देण्याचा ठराव संस्थेचे अध्यक्ष डॉ कपिल कोरके यांच्या अध्यक्षते खाली मंजूर करण्यात आला. यामुळे महाराष्ट्रात पहिल्यांदाच हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुंगशी विद्यालय या शाळेचे नाव यापुढे मनोज जरांगे पाटील विद्यालय , मुंगशी ( दहिटणे ) ठेवण्यात येणार असून या शाळेचे नामकरण मनोज जरांगे पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे. तसेच या कार्यक्रमास स्वराज संघटनेचे संस्थापक छत्रपती संभाजी राजे प्रमुख पाहुणे असणार आहेत तसेच विशेष बाब म्हणजे महाराष्ट्रातील २६ मराठा खासदारांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले जाणार आहे.

सध्या विद्यालयात ५ वी ते दहावी पर्यंत वर्ग चालू असून या शाळेत मुंगशी,दहीटणे येथील शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेचे वैशिष्टय म्हणजे दहावीच्या शंभर टक्के निकालाची यशसवी परंपरा कायम ठेवली आहे. मनोज जरांगे पाटील यांचं मराठा समाजासाठी मोठ योगदान आहे तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळाले तर शालेय विद्यार्थांना याचा मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे आपल्या समाजासाठी आपण ही काहीतरी देण लागतो या उदात्त हेतूने आपण हा निर्णय घेतल्याचे संस्थेचं अध्यक्ष डॉ कपिल कोरके यानी सांगीतले.

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे – पाटील यांचे नाव आमच्या गावातील शाळेला देऊन मुंगशी गावाची महाराष्ट्रात मान उंचावली असुन आम्हा ग्रामस्थांना याचा सार्थ अभिमान आहे – आशिष क्षीरसागर , उपसरपंच मुंगशी

मनोज जरांगे – पाटील यांच मराठा समाजासाठी फार मोठं योगदान आहे त्यांनी केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचा फायदा शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक जिवनात होणार आहे त्यामुळे आमच्या संस्थेच्या विद्यालयास त्यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे – डॉ. कपिल कोरके अध्यक्ष जय जगदंबा शिक्षण संस्था

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button