केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर येथे होणार व्हाईस ऑफ मीडियाचे अधिवेशन

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : अधिवेशनाचे उदघाट्क केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत, तर व्हॉईस ऑफ मीडियाचे अध्यक्ष संदीप काळे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच चंद्रपूर विधानसभा आमदार किशोर जोरेगेवार, केंद्रीय अध्यक्ष संजय आवटे, राज्याध्यक्ष राजा माने, हंसराज अहिर यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत नागपूर येथे होणार व्हाईस ऑफ मिडिया चे अधिवेशन होणार असल्याचे महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष जेष्ठ संपादक राजा माने यांनी सांगितले.
पत्रकार आणि पत्रकारितेसाठी कृतिशील उपक्रम राबविणारी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ही संघटना देशातील पत्रकारांसाठी हक्काची चळवळ बनली आहे. संघटनेचा विस्तार वेगाने होत आहे. अवघ्या दोन वर्षांत देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे जाळे 28 राज्यात व सर्व केंद्रशासित प्रदेशात पसरले आहे. संघटनेने 26 हजार सभासदांचा टप्पा पार केला आहे.
या संघटनेचे विदर्भ विभाग अधिवेशन रविवार, 16 एप्रिल 2023 रोजी किंग्जवे ऑडिटोरिअम, (परवाना भवन) कस्तुरचंद पार्कजवळ, नागपूर येथे होत आहे. पत्रकारांच्या समस्यांवर चर्चा, उपायांवर मंथन होईल. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची भूमिका, भविष्यातील उपक्रम आदींची माहिती देण्यात येईल. या कार्यक्रमात आपण सहभागी होऊन पत्रकारांच्या हक्कासाठीच्या चळवळीला बळ देण्यासाठी या अधिवेशनामध्ये सहभागी होण्याचे आवाहन व्हाईस ऑफ मिडिया संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.