नागपूरमहाराष्ट्र

‘अस्मानी संकटात राज्य सरकार भक्कमपणे तुमच्या पाठीशी…’: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोहारी सावंगा येथील ग्रामस्थांशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद

B1न्यूज मराठी नेटवर्क500

लोहारी सावंगा( नागपूर), : राज्यात दुष्काळाच्या स्वरूपात अस्मानी संकट उभे ठाकले असताना राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. आर्थिक मदतीसह विविध योजनांचा आधार दुष्काळग्रस्तांना दिला जात आहे.आगामी काळातही अनेक योजना लागू करण्यात येणार असून या अस्मानी संकटाचा आम्हा सर्वांना एकजुटीने सामना करावा लागेल, असे आश्वासक उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर जिल्ह्यातील लोहारी सावंगा गावात गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने आयोजित प्रार्थना सभेनंतर उपस्थित ग्रामस्थांपुढे बोलताना काढले.500लोहारी सावंगा गावातील ग्रामपंचायतच्या आवारातील सभामंडपात या प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या समवेत नागपूरचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सर्वश्री चरणसिंह ठाकूर, आशिष देशमुख, डॉ. राजीव पोतदार, माजी आमदार सुधाकर कोहळे यांच्यासह जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.500ग्रामस्थांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, हे वर्ष आव्हानांचे आहे. पावसाने शेवटपर्यंत दडी दिली. त्यामुळे पिके करपली व शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. राज्यात काही ठिकाणी चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या कठीण प्रसंगी राज्य सरकार अतिशय भक्कमपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहे. मध्यंतरी कर्जमाफीचा मोठा निर्णय घेऊन सरकारने शेतकऱ्यांना पुन्हा स्वतःच्या पायावर उभे केले. लाखो शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांपुढे पुन्हा एकदा संकट उभे ठाकले आहे. त्यासाठी आता राज्य सरकारने शेतकऱ्यांना थेट मदतीचा हात दिला आहे. 500शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करता यावी यासाठी सरकारने सुमारे दीड कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजारांची रक्कम जमा केली आहे. ही रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरूच आहे. शेतकऱ्यांचे विज बिल माफ करण्यात आले आहे. शिवाय वीज बिलाची थकबाकी देखील माफ करण्यात आली आहे. याशिवाय, ग्रामीण जनतेला दिलासा देण्यासाठी विविध योजना लागू करण्यात आल्या आहेत. आगामी काळातही काही योजना लागू करण्यात येणार आहेत. जलसंधारणाची कामे व्यापक प्रमाणात हाती घेतली जाणार आहेत. लोकांच्या आरोग्यासह विविध प्रश्न दूर करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत.500शेतकरी संकटात असताना दिवाळीचे हे पर्व त्याला धीर देण्यात घालवावे, या उद्देशाने आम्ही गावात आलो आहोत, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार, त्यांची ग्रामगीता आणि भजनांचा संदर्भ देत मुख्यमंत्री म्हणाले राष्ट्रसंतांच्या भजनांमध्ये फार मोठी शक्ती आहे. संकटाच्या काळात व्यक्ती कितीही खचली तरी राष्ट्रसंतांच्या विचारांनी त्याला उभारी मिळते. त्यांच्या ग्रामगीतेचा विचार गावांना सर्वच अंगांनी समृद्ध बनवतो. दुष्काळाच्या काळात आपण नेमके काय केले केले पाहिजे, यावर राष्ट्रसंतांनी मांडलेले विचार अत्यंत प्रेरक आणि दिशादर्शक आहेत. गुरुदेवांच्या या विचारांनी देखील आम्हा सर्वांना या संकटाचा सामना करण्याचे बळ मिळो, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button