प्रशासनबार्शीमहाराष्ट्र

हरवलेला चिमुकला काही तासांत आईच्या कुशीत; बार्शी तालुका पोलिसांची तत्परता आणि संवेदनशीलतेचे कौतुक!

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी : रस्त्यावर एकटा रडत फिरणारा चिमुकला, तर दुसरीकडे आपल्या काळजाच्या तुकड्याच्या शोधात व्याकूळ झालेली आई… अशा भावनिक प्रसंगात बार्शी तालुका पोलिसांनी दाखवलेली तत्परता, संवेदनशीलता आणि कर्तव्यनिष्ठा यामुळे काही तासांतच आई आणि मुलाची सुखरूप भेट घडून आली. पोलिसांच्या या माणुसकीपूर्ण कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.500रस्त्यावर एक लहान मूल एकटेच रडत फिरत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी तत्परता दाखवत त्या चिमुकल्याला बार्शी तालुका पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या स्वाधीन केले. ही बाब समजताच पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी स्वतः पुढाकार घेत मुलाच्या पालकांचा शोध घेण्यास सुरुवात केली.500चिमुकल्याच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत पोलिसांनी तातडीने शोधमोहीम हाती घेतली. पोलीस ठाण्याच्या हद्दीपुरते मर्यादित न राहता परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. मुलाच्या हालचालींचा मागोवा घेत उपलब्ध तांत्रिक माहितीच्या आधारे काही वेळातच त्याच्या आईचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले.500सदर चिमुकल्याचे नाव आर्यन अबदेश वर्मा असून त्याच्या आईचे नाव ज्योती आहे. त्या बार्शी येथील फुले मंगल कार्यालयासमोर सादिक वस्ताद यांच्या येथे भाड्याने राहतात. पोलिसांनी आईचा शोध घेऊन चिमुकल्याला तिच्या स्वाधीन केले. आपल्या काळजाचा तुकडा सुखरूप समोर पाहताच आईच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. काही तासांपासून सुरू असलेली आईची चिंता अखेर संपुष्टात आली.500या संपूर्ण शोधमोहिमेत ठाणे अंमलदार अरुण डुकळे व शंकर खराडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच नागरिक श्रीकांत वायचळ, अभिजीत शिंदे आणि सादिक शेख यांनीही मोलाचे सहकार्य केले.500पोलिसांची तत्परता, नागरिकांचे सहकार्य आणि माणुसकीचा सुंदर संगम! हरवलेल्या चिमुकल्याला पुन्हा आईच्या कुशीत पोहोचविण्याच्या या कार्यातून बार्शी तालुका पोलिसांनी केवळ कर्तव्यच बजावले नाही, तर खाकी वर्दीतील माणुसकीचेही दर्शन घडवून दिले.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button