क्राईममहाराष्ट्रसोलापूर

अवैध सावकारीविरोधात सोलापूर शहरात सहकार विभागाची धडक कारवाई; एकावर गुन्हा दाखल

सावकाराच्या घरातून कोरे धनादेश, कोरे बाँड, स्टॅम्प पेपरसह महत्त्वाची कागदपत्रे जप्त; दुसऱ्या ठिकाणी आक्षेपार्ह कागदपत्रे आढळली नाहीत

B1न्यूज मराठी नेटवर्क500

सोलापूर : सोलापूर शहरातील अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी सहकार विभागाने धडक कारवाई सुरू केली आहे. जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन, जिल्हा उपनिबंधक मुकुंद पवार तसेच उपनिबंधक सहकारी संस्था, सोलापूर शहर उमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध सावकारीच्या तक्रारींच्या अनुषंगाने दोन स्वतंत्र पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. या पथकांनी दोन ठिकाणी छापे टाकून तपासणी केली. यामध्ये एका ठिकाणी अवैध सावकारीसंदर्भातील महत्त्वाची कागदपत्रे आढळून आल्याने संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.500उपनिबंधक सहकारी संस्था, सोलापूर शहर कार्यालयातील पथक क्रमांक एकचे प्रमुख राज नरहरी ढोणे, सहकारी अधिकारी श्रेणी-२, सहाय्यक सहकारी अधिकारी आरती दीपक जतकर, सहकारी अधिकारी श्रेणी-२, सहाय्यक के. बी. जमादार आणि सहाय्यक सहकारी अधिकारी जय लक्ष्मण पतंगे यांच्या पथकाने अर्जदारांच्या तक्रारीनुसार कर्णिक नगर, यल्लालिंग मठाजवळ, वज्रेश्वर नगर परिसरातील युवराज अशोक जानकर यांच्या घराची दि. ४ नोव्हेंबर २०२६ रोजी झडती घेतली.500या झडतीमध्ये संबंधित व्यक्ती अवैध सावकारी व्यवसाय करीत असल्याबाबत लोकांकडून घेतलेले कोरे धनादेश व कोरे बाँड, अनामत ठेव पावती, इसारा पावती व करारपत्र, खरेदीखत, रक्कम घेतल्याचे व परत केल्याचे पोहोच पावती असे टंकलिखित केलेले स्टॅम्प पेपर तसेच वाहन खरेदी पावती व करारपत्र आदी महत्त्वाची कागदपत्रे आढळून आली. या प्रकरणी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मधील कलम ३९ व ४१ अन्वये एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे, सोलापूर शहर येथे पथक प्रमुख राज नरहरी ढोणे यांनी दि. ५ नोव्हेंबर २०२६ रोजी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, पथक क्रमांक दोनचे प्रमुख के. टी. चव्हरे, सहकारी अधिकारी श्रेणी-१, सहाय्यक के. एस. मळवे, सहकारी अधिकारी श्रेणी-२, सहाय्यक एस. डी. वढे आणि सहाय्यक सहकारी अधिकारी के. जी. गोंड यांच्या पथकाने तक्रारीनुसार ललितकुंज नगर परिसरातील निलेश चंद्रकांत हरे यांच्या घराची झडती घेतली. मात्र, या ठिकाणी अवैध सावकारी व्यवसाय सुरू असल्याबाबत कोणतेही आक्षेपार्ह दस्तऐवज आढळून आले नाहीत.500सोलापूर शहरातील नागरिकांना अवैध सावकारीसंदर्भात काही तक्रारी किंवा माहिती असल्यास त्यांनी उपनिबंधक, सहकारी संस्था, सोलापूर शहर कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन उपनिबंधक सहकारी संस्था उमेश उपवार यांनी केले आहे.

अवैध सावकारीविरोधात तक्रार करण्याचे आवाहन

अवैध सावकारी, जादा व्याजाची आकारणी तसेच कर्जवसुलीसाठी होणाऱ्या त्रासाबाबत नागरिकांनी निर्भयपणे तक्रारी कराव्यात. अशा तक्रारींची दखल घेऊन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे सहकार विभागाने स्पष्ट केले आहे.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button