महाराष्ट्रमुंबई

महिलांना एनसीएमसी कार्डसाठी नवीन वर्षापर्यंत मुदतवाढ ! कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय १ जानेवारी २०२७ पर्यंत पुढे ढकलला – परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक

B1न्यूज मराठी नेटवर्क500

मुंबई, दि. ६ नोव्हेंबर २०२६ : महिलांना एसटी प्रवासात मिळणाऱ्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी (NCMC) स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला १ जानेवारी २०२७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे उद्या, दि. ७ नोव्हेंबरपासून ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत स्मार्ट कार्ड नसतानाही महिला लाभार्थ्यांना प्रवास सवलतींचा लाभ घेता येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.500शासनाच्या निर्देशानुसार प्रवास सवलतींचा लाभ अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी एसटी महामंडळाने एनसीएमसी स्मार्ट कार्ड वितरणाची प्रक्रिया सुरू केली आहे. १ ऑक्टोबर २०२६ पासून हे कार्ड महिला व ज्येष्ठ नागरिकांना अनिवार्य करण्यात आले होते. आतापर्यंत सुमारे १ कोटी १० लाख कार्डाची नोंदणी व वितरण झाले आहे. मात्र, ग्रामीण भागातील अनेक महिलांची नोंदणी अद्याप अपूर्ण असल्याचे निदर्शनास आले आहे.500

ही बाब लक्षात घेऊन तसेच विविध सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे नेते आणि मंत्री महोदयांकडून करण्यात आलेल्या विनंती व सुचनांचा सकारात्मक विचार करून महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.

ग्रामपंचायत स्तरावर विशेष नोंदणी शिबिरे

राज्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत स्मार्ट कार्ड पोहोचविण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटना आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने ही मोहीम राबविण्यात येईल. ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत सर्व महिला लाभार्थ्यांची १०० टक्के नोंदणी व कार्ड वितरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महामंडळाने निश्चित केले आहे.

या मुदतवाढीच्या कालावधीत सर्व महिलांनी एनसीएमसी स्मार्ट कार्डची नोंदणी पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button