बार्शीमदतमहाराष्ट्र

वाढदिवसाचा जल्लोष टाळून कॅप्टन बाळासाहेब डमरे यांच्याकडून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत

देशसेवा हाच धर्म, समाजसेवा हेच कर्तव्य!

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी : देशसेवेचे व्रत स्वीकारून भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेले कॅप्टन बाळासाहेब डमरे यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या वाढदिवसानिमित्त एक आदर्शवत उपक्रम राबविला आहे. सध्या परिसरात दुष्काळाचे संकट असून शेतकरी बांधव आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत. अशा परिस्थितीत वाढदिवसाचा जल्लोष आणि अनावश्यक खर्च टाळून तोच पैसा दुष्काळग्रस्त व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय त्यांनी घेतला.500‘देशसेवा हाच धर्म आणि समाजसेवा हेच कर्तव्य’ ही भावना मनात ठेवून कॅप्टन बाळासाहेब डमरे यांनी वाढदिवस साजरा करण्याऐवजी गरजू कुटुंबांना आर्थिक मदतीचा हात दिला.

या उपक्रमांतर्गत डोराळे येथील उर्मिला चंद्रकांत धायगुडे यांचे आत्महत्याग्रस्त कुटुंब तसेच संतोष सुरेश शिंदे यांचे आत्महत्याग्रस्त कुटुंब अशा दोन कुटुंबांना आर्थिक मदत करण्यात आली. वाढदिवसाच्या आनंदाला सामाजिक सेवेची जोड देत त्यांनी समाजासमोर माणुसकीचा आणि सामाजिक जाणीवेचा संदेश दिला.500यावेळी कॅप्टन बाळासाहेब डमरे, माजी नगरसेवक दिलीपकुमार डमरे, आदर्श उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रविंद्र अण्णासाहेब राऊत, प्रसाद डमरे, डोराळे गावचे सरपंच अमोल शिंदे, शेखर जगताप, सोनू शिंदे, समाधान देशमुख, राहुल खरात, ग्रामपंचायत सदस्य अमोल शिंदे, सरपंच दत्ता चोरमले, दूध डेअरीचे चेअरमन नंदू शिंदे, नितीन जाधव, अमोल राजगुरू, शरद शिंदे, बाबासाहेब रड्डी यांच्यासह सर्व सहकारी उपस्थित होते.

वाढदिवसाचा खर्च गरजूंच्या मदतीसाठी वापरून कॅप्टन बाळासाहेब डमरे यांनी देशसेवेसोबतच समाजसेवेचेही भान जपले असून त्यांच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button