पुणेमहाराष्ट्र

बारामती येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्न; पाच कलाप्रकारांत १५० युवक-युवतींचा सहभाग

B1न्यूज मराठी नेटवर्क500

पुणे, बारामती : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे, नेहरू युवा केंद्र, पुणे, टी.सी. कॉलेज, बारामती आणि राष्ट्रीय एकात्मता विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सव २०२६-२७ बारामती येथील टी.सी. कॉलेजमध्ये उत्साहात पार पडला. या महोत्सवात समूह लोकनृत्य, समूह लोकगीत, चित्रकला, पथनाट्य आणि कविता लेखन या पाच कलाप्रकारांत जिल्ह्यातील सुमारे १५० युवक-युवतींनी सहभाग घेतला.500महोत्सवाचे उद्घाटन बारामती नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सचिन सातव, क्रीडा व युवक सेवा पुणे विभागाचे उपसंचालक युवराज नाईक, जिल्हा युवा अधिकारी आशिष शेटे, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी ताहेर आसी आणि टी.सी. कॉलेजचे प्राचार्य डॉ. अविनाश जगताप यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.

यावेळी सचिन सातव यांनी युवा महोत्सव हे युवकांमध्ये एकता, सामाजिक बांधिलकी व आत्मविश्वास निर्माण करणारे व्यासपीठ असल्याचे सांगितले. युवकांनी व्यसनांपासून दूर राहून ज्ञानार्जनाची आवड जोपासावी आणि आपल्या आवडीच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.500‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ या संकल्पनेवर आधारित महोत्सवातून युवकांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती होण्यास मदत होईल, असा विश्वास प्राचार्य डॉ. अविनाश जगताप यांनी व्यक्त केला. तर युवराज नाईक यांनी युवा महोत्सवाच्या जिल्हा ते राष्ट्रीय स्तरावरील आयोजनाची माहिती देत सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.500महोत्सवात विविध कलाप्रकारांतील विजेत्यांना पोलीस उपअधीक्षक चैतन्य कदम, कलाकार रामभाऊ जगताप आणि सुभाषराव मदने यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. युवकांनी चांगल्या सवयी जोपासून व्यसनमुक्त जीवन जगावे, असे आवाहन चैतन्य कदम यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले. महेश चावले, तालुका क्रीडा अधिकारी, इंदापूर व स्पर्धा समन्वयक प्रा. भीमराव तोरणे यांनी आभार मानले.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button