कृषीबार्शीमहाराष्ट्र

श्री स्वामी समर्थ दूध संकलन केंद्राकडून दूध उत्पादकांना २ लाख ७० हजार रुपयांचा बोनस वाटप

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर चारा डेपोचे नियोजन; जनावरांचे मोफत लसीकरण आणि म्हैस दूध उत्पादकांना दिवाळी किटचे वाटप

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी ,गुळपोळी (ता. बार्शी) : श्री स्वामी समर्थ दूध संकलन केंद्र, गुळपोळी यांच्या वतीने यंदाच्या आर्थिक वर्षात दूध उत्पादक सभासदांना प्रतिलिटर एक रुपया याप्रमाणे एकूण २ लाख ७० हजार रुपयांचा बोनस वितरित करण्यात आला आहे. तसेच म्हैस दूध उत्पादकांना दिवाळीनिमित्त उपयोगी साहित्याच्या किटचे वाटप करण्यात आले.500श्री स्वामी समर्थ दूध संकलन केंद्राची स्थापना २ ऑक्टोबर २०२० रोजी झाली असून, केंद्राचे चेअरमन लक्ष्मण राजेंद्र काळे आहेत. या केंद्रामार्फत यंदाच्या आर्थिक वर्षात २ लाख ७० हजार लिटर दूध संकलन करण्यात आले आहे. या दूध संकलनातून १ कोटी ३ लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. केंद्रावर गाय व म्हैस दूध उत्पादक असे एकूण ७० सभासद नियमित दूध संकलन करतात.500दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या कष्टाचे चीज व्हावे, या उद्देशाने प्रतिलिटर एक रुपया याप्रमाणे बोनसचे वाटप करण्यात आले. त्यानुसार सर्व दूध उत्पादक सभासदांना एकूण २ लाख ७० हजार रुपयांचा बोनस देण्यात आला.500याशिवाय दूध संकलन केंद्राच्या वतीने गाय व म्हशींचे विविध आजारांपासून संरक्षण व्हावे, यासाठी मोफत लसीकरण करण्यात आले आहे. सध्या दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन पशुधनासाठी चारा उपलब्ध व्हावा, यासाठी चारा डेपोचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी चाराकुट्टीच्या दरात कपात करून प्रतिटन ३०० रुपये दराने चाराकुट्टी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.500दूध उत्पादकांचे आर्थिक हित जपण्याबरोबरच पशुधनाचे आरोग्य आणि चारा उपलब्धतेसाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या श्री स्वामी समर्थ दूध संकलन केंद्राच्या कार्याचे दूध उत्पादक सभासदांकडून कौतुक होत आहे.500

500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button