बार्शीमहाराष्ट्रसामाजिक

श्रीपत पिंपरीत सातशे कुटुंबांना दिवाळी साहित्याचे किट वाटप

जनकल्याण प्रतिष्ठानचे राज्याध्यक्ष बाळासाहेब काकडे यांचा सामाजिक उपक्रम; दुष्काळग्रस्त कुटुंबांची दिवाळी केली गोड

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जनकल्याण प्रतिष्ठानचे राज्याध्यक्ष बाळासाहेब काकडे यांच्या वतीने बार्शी तालुक्यातील श्रीपत पिंपरी येथे गरजू कुटुंबांना दिवाळी साहित्याचे किट वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे गावातील सुमारे सातशे कुटुंबांची दिवाळी गोड झाली.500सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी आणि मजूर वर्ग मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. अनेक कुटुंबांना दिवाळीचा सण साजरा करणेही अवघड झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन जनकल्याण प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरजू कुटुंबांना मदतीचा हात देण्यात आला.500

या किटमध्ये साखर, रवा, मैदा, तेल, बेसन, साबण, गूळ, मीठ आदी दिवाळीसाठी आवश्यक साहित्याचा समावेश होता. या मदतीमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला.500

जनकल्याणचा सामाजिक कार्यात पुढाकार

दुष्काळाच्या काळात केवळ बोलून न थांबता प्रत्यक्ष कृतीतून मदत करणे हेच खरे सामाजिक कार्य आहे, अशी भावना यावेळी बाळासाहेब काकडे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. जनकल्याण प्रतिष्ठानने गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात पुढाकार घेतला असून गरजूंना मदत करण्याचे काम सातत्याने सुरू ठेवले आहे.500

या उपक्रमावेळी सरपंच रामराजे ताकभाते, मयूर यादव, विजयकुमार ताकपिरे, तानाजी घुगे, भास्कर मंडले, भारत धाडगे, सुजीत कदम, निलेश काकडे, पोपट काकडे, धर्मराज काकडे, पोपट ताकमाते, रविंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.500जनकल्याण प्रतिष्ठानचे राज्याध्यक्ष बाळासाहेब काकडे आणि प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकीतून केलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button