धार्मिकबार्शीमहाराष्ट्र

आनंद शिंदेंचं गाणं, भाऊ कदमची कॉमेडी: असा रंगणार भगवंत महोत्सव

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : नगरपालिका व भगवंत देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने भगवंत महोत्सव समितीच्या माध्यमातून दि.२६ एप्रिल ते दि २ मे दरम्यान येथील भगवंत मैदानावर भगवंत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यादरम्यान विविध सांस्कृतिक व अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

भगवंत महोत्सवाची रूपरेषा पुढीलप्रमाणे:-

१) २६ एप्रिल:- प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा भावगीत व भक्ती गीत कार्यक्रम
२) २७ एप्रिल:-करून गेलं गाव हे ओंकार भोजने व भाऊ कदम यांचे नाटक.
३) २८ एप्रिल:- एका लग्नाची दुसरी गोष्ट
४) २९ एप्रिल:-कल्चर ऑफ इंडिया सांस्कृतिक कार्यक्रम
५)३० एप्रिल:- रंग जल्लोष सांस्कृतिक कार्यक्रम.
६) १ मे:- बार्शीतील स्थानिक कलाकारांचा कार्यक्रम.
७) २ मे:- पहाटे प्रकट दिनानिमित्त डॉ.जयवंत बोधले महाराज यांचे कीर्तन,सकाळी ९ वाजता

शोभायात्रा,दुपारी १२:३० वाजता महाप्रसाद मॉर्निंग क्लब यांच्या वतीने

भगवंत महोत्सवामध्ये रावसाहेब मनगिरे, सचिन मडके, मुन्ना सोनिग्रा,बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती, नगरपालिका अभियंते,शिवशक्ती बँक यांचे विशेष सहकार्य असणार आहे. यावेळी डॉ.बी.वाय.यादव, आसिफभाई तांबोळी,सुभाष लोढा,विलास रेणके,रमेश पाटील,दादासाहेब बुडुख,बाबासाहेब कथले मालक,भारत पवार,श्रीधर कांबळे,दीपक राऊत, तुकाराम माने तसेच भावीक,भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button