बार्शीमहाराष्ट्र

आदिवासी कोळी समाजाची कार्यशाळा बार्शी येथे संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : समाज बांधवानी संघटितपणे लढा दिला तर आपले प्रश्न लवकरच सुटतील असे विचार प्रा. शरण खानापूरे यांनी येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात कोळी समाज कार्यशाळेत बोलताना व्यक्त केले. या कार्यक्रमात आमदार राजाभाऊ राऊत यांनी आगामी काळात कोळी समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू व कोळी समाजाच्या प्रश्नाबद्दल विधानसभेत आवाज उठवू असे आश्वासन समाजबांधवास दिले.
या कार्यशाळेत मनोहर कोळी रेणुकाचार्य खानापुरे, सिद्धेश्वर कोळी, बाळासाहेब बळवंतराव गीतांजली कोळी या मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची
या कार्यशाळेत खानापुरे सरांनी विविध पुराव्यांद्वारे समाजावर होत असलेल्या अन्याया बद्दल विविध मुद्द्यांवर विस्तृत मार्गदर्शन केले.
तालुकाध्यक्ष दत्तात्रय सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुधीर घाडगे ,कमलाकर कांबळे, भालचंद्र सोनवणे, शशिकांत कांबळे, उमेश कांबळे, सतीश कोळी, दीपक बारंगुळे,अमोल कोळी, शाम कोळी, सुनील कोळी, अमर कांबळे व सर्व समाजबांधवांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास संपूर्ण राज्यभरातून समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदेश घाडगे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button