सुश्रुत हॉस्पिटल येथे बाल आरोग्य शिबिरात १३७ रुग्णांची (बालकांची) मोफत 2 डी इको कार्डिओग्राफी

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : २५ मार्च २०२३ रोजी सुश्रुत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, बार्शी यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या मोफत बाल हृदयरोग निदान शिबिरामध्ये (2डी इको काडीओग्राफी) ० ते १८ वयोगटातील एकूण १३७ रुग्णांची (बालकांची) मोफत 2 डी इको कार्डिओग्राफी ही पुण्याचे लहान मुलाचे सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.पंकज सुगावकर यांच्यामार्फत करण्यात आली. व त्यांना पुढील मोफत उपचाराचे मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिरास आवर्जून उपस्थित असलेले बार्शी तालुक्यातील IMA President डॉ. तांबारे मॅडम,डॉ.मुकुंद तांबारे , medical Superintendent डॉ.सचिन कदम, डॉ.शीतल बोपलकर , स्त्री रोग तज्ञ डॉ. रवींद्र माळी ,सोलापूरचे सिव्हिल सर्जन डॉ.धनंजय पाटील ,धाराशिवचे सिव्हिल सर्जन डॉ. गलांडे व नामांकित लहान मुलांचे डॉक्टर्स डॉ. विजयसिंह भातलवंडे, डॉ. युवराज रेवडकर, डॉ.नानासाहेब बारस्कर तसेच RBSK चे डॉ. सुबोध केसकर, डॉ. घोंगडे इत्यादी डॉक्टरांची मोलाची मदत झाली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या