अट्टल मोटार सायकल चोरास अटक, 12 मोटार सायकलसह 5,70,000/- रू. मुद्देमाल हस्तगत

B1न्यूज मराठी नेटवर्क
स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांची उल्लेखनीय कामगिरी
सोलापूर ग्रामीण जिल्हयाचे कार्यक्षेत्रात होत असलेल्या वाहन चो-या उघडकीस आणुन त्यांना प्रतिबंध करणेबाबत मा. श्री. शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिश्ठ पोलीस निरीक्षक, सुहास जगताप यांना आदेषीत केले होते.
सदर आदेशाच्या अनुषंगाने कारवाई करण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक, धनजंय पोरे यांचे पथक सोलापूर तालुका पोलीस ठाणेच्या हद्दीत पेट्रोलींग करीत असताना गोपनिय माहिती मिळाली की, सोलापूर ते तुळजापुर महामार्गावरी होनसळ फाटा, ता. उत्तर सोलापूर येथे एक इसम त्याचे ताब्यात नंबर प्लेट नसलेली चोरीची बुलेट मोटार सायकल घेवुन येणार आहे. सदर बातमीच्या अनुशंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्कळा होनसळ फाटा, ता.उत्तर सोलापूर येथे सापळा रचुन एका इसमास त्याच्या ताब्यातील मोटार सायकलसह पकडले.
सदर पथकाने नमुद मोटार सायकल बाबत केलेल्या सखोल व कौषल्यपुर्ण तपासमुळे नमुद आरोपी याने सदरची मोटार सायकल सोलापूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतुन चोरी केले असल्याचे निश्पन्न झाले. सदर आरोपीकडे केलेल्या अधिक तपासात त्याने सदरची मोटार सायकल सोलापूर तालुका पोलीस ठाणे हद्दीत साखरेवाडी येथुन त्याच्या मित्रासह चोरी केल्याचे कबुल केले. सदर आरोपी ने नमुद मोटार सायकल चोरी सोबत सोलापूर ग्रामीण, सोलापूर षहर, उस्मानाबाद, लातुर तसेच विजयापुर राज्य कर्नाटक येथे मागील 2 वर्षात मोटार सायकल चोरी केले असल्याचे सांगितले. नमुद आरोपीकडुन खालील जिल्हयातील विविध पोलीस ठाणेतील गुन्हे उघडकीस आले आहेत.
सोलापूर ग्रामीण
1 सोलापूर तालुका पो.ठाणे 78/2023 भादंवि क 379, 511
2 पांगरी पो.ठाणे 02/2023 भादंवि क 379
3 पांगरी पो.ठाणे 13/2023 भादंवि क 379
सोलापूर शहर
4 एमआयडीसी पो.ठाणे 678/2021 भादंवि क 379
5 एमआयडीसी पो.ठाणे 758/2021 भादंवि क 379
6 एमआयडीसी पो.ठाणे 365/2022 भादंवि क 379
7 सदर बाजार पो.ठाणे 701/2021 भादंवि क 379
8 सदर बाजार पो.ठाणे 499/2022 भादंवि क 379
उस्मानाबाद
9 उस्मानाबाद शहर पो.ठाणे 312/2022 भादंवि क 379
10 बेंबळी पो.ठाणे 138/2022 भादंवि क 379
लातुर
11 एमआयडीसी पो.ठाणे 171/2023 भादंवि क 379
12 विजयापूर कर्नाटक आदर्ष नगर पो.ठाणे 124/2023 भादंवि क 379
नमुद आरोपी कडुन वरील गुन्हयातील एकुण 5,70,000/- रू. किमतीच्या एकुण 12 मोटार सायकल व एक मोबाईल हॅन्डसेट हस्तगत करण्यात आला आहे. नमुद आरोपी यास सोलापूर तालुका पोलीस ठाणे गुरंन 78/2023 भादंवि क 379, 511 अन्वये दिनांक 14/03/2023 रोजी अटक करण्यात आली असुन, त्याची दिनांक 15/03/2023 पर्यंत पोलीस कोठडी मंजुर आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक, शिरीष सरदेशपांडे, मा. अपर पोलीस अधीक्षक, हिम्मत जाधव, यांचे मार्गदर्शनाखाली, वरीश्ठ पोलीस निरीक्षक, सुहास जगताप, स्था.गु.शा, यांचे नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेकडील सहा.पोलीस निरीक्षक, धनंजय पोरे यांचे पथकातील, श्रेणीउपनि/राजेष गायकवाड, सहापोउनि/ बिराजी पारेकर, श्रीकांत गायकवाड पोहकॉ/सलीम बागवान, विजयकुमार भरले, हरिदास पांढरे, आबासाहेब मुंढे पोना/रवि माने पोकॉ/ विनायक घोरपडे, समर्थ गाजरे चापोकॉ/दिलीप थोरात यांनी बजावली आहे.