सत्कारसामाजिकसोलापूर

सोलापूर सोशल फाऊंडेशन व महिला पतंजली योग समिती यांच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा गौरव सन्मान सोहळा संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : सोशल फाऊंडेशन व महिला पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या महिलांचा गौरव सन्मान सोहळा आज सोलापूर येथे पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर सोशल फाउंडेशनचे संस्थापक मा.आ.सुभाष बापू देशमुख हे उपस्थित होते.यावेळी सामाजिक, शैक्षणिक अश्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या महिलांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. कर्तृत्ववान महिलांच्या कार्याचा होत असलेला हा सन्मान आनंददायी आहे आणि हा सन्मान होत राहिला पाहिजे असे मत मा. बापूसाहेब यांनी कार्यक्रमात बोलताना मांडले. या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार पोलीस उपायुक्त दिपाली काळे पतंजली योग समिती राज्य प्रभारी सुधाताई अळीमोरे, फाउंडेशन संचालिका मयुरी वाघमारे-शिवगुंडे व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button