देश-विदेशमहाराष्ट्र

महाराष्ट्र सदनाचे अपर निवासी आयुक्त म्हणून निवा जैन यांनी पदभार स्वीकारला

B1न्यूज मराठी नेटवर्क

नवी दिल्ली : महाराष्ट्र सदनाचे अपर निवासी आयुक्त म्हणून श्रीमती निवा जैन यांनी शुक्रवार 03 मार्च 2023 रोजी पदभार स्विकारला. तसेच, प्रभारी निवासी आयुक्त डॉ. निधी पांडे यांची बदली विभागीय आयुक्त, अमरावती विभाग, अमरावती येथे झाल्यामुळे रिक्त असलेल्या निवासी आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभारही श्रीमती निवा जैन यांनी स्वीकारला आहे. श्रीमती निवा जैन या भारतीय पोलिस सेवेतील 2008 च्या तुकडीचे महाराष्ट्र कॅडरचे अधिकारी असून अपर पोलिस आयुक्त, दक्षिण प्रादेशिक विभाग, नागपूर शहर या पदावर यापूर्वी कार्यरत होत्या.
श्रीमती निवा जैन यांनी महाराष्ट्र सदनाच्या अपर निवासी आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर महाराष्ट्र परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक (माहिती) अमरज्योत कौर अरोरा यांनी आज श्रीमती निवा जैन यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी श्रीमती अरोरा यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राद्वारे करण्यात येणारे प्रसिध्द कार्य, तसेच परिचय केंद्राच्यातवीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचीही माहिती दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button