अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर पुरवठा करण्याच्या योजनेस अर्ज करण्यास मुदतवाढ

B1न्यूज मराठी नेटवर्क
उस्मानाबाद,दि.14 (जिमाका):- अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शासन स्तरावरुन निश्चित करण्यात आलेल्या आहेत. तरी जिल्ह्यातील इच्छुक अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांनी http://mto.mahasamajkalyan.in या संकेतस्थळावर आपला ऑनलाईन अर्ज भरुन त्याची सत्यप्रत दि.12 फेब्रुवारी 2023 पर्यंत सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते.
तथापि, आता अर्ज भरण्याची मुदत दि.02 मार्च 2023 पर्यंत वाढविण्यात आली आहे. स्वयंसहाय्यता बचत गटांनी वरील नमूद संकेतस्थळावर अर्ज भरुन त्याची सत्यप्रत 02 मार्चपर्यंत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण उस्मानाबाद या कार्यालयास सादर करावी, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त बी.जी.अरवत यांनी केले आहे.