आनंद बाजारातून बार्शीच्या विदयार्थ्यांनी घेतले व्यवहाराचे धडे , नवीन मराठी शाळेचा उपक्रम

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार्शी एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा, बार्शी या शाखेमध्ये शनिवारच्या बाजार दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीचा एक भाग म्हणून प्रात्यक्षिकातून व्यवहारज्ञान घेण्याचा प्रयत्न ‘आनंद बाजार’ या उपक्रमातून करण्यात आला. या बाजाराला विदयार्थ्यांचा पालकांचा, शहरातील नागरिकांचा अगदी भरभरून प्रतिसाद मिळाला. शनिवार दि. ७ डिसेंबर रोजी नवीन मराठी शाळेमध्ये ‘आनंद बाजार’ हा उपक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी न. पा. प्रा. शि. मंडळाचे प्रशासनाधिकारी अनिल बनसोडे होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले बार्शी नगरपालिकेचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक संजय पाटील, संस्थेचे सचिव अनंत कवठाळे, संचालक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रसन्न देशपांडे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष निलेश पवार, उदयोजक श् महेश यादव, सूरज ढमढेरे व शाळेचे मुख्याध्यापक भानुदास लष्कर व इतर मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये विदयार्थ्यांना पालेभाज्या, फळभाज्या फळे, यांची विक्री याबरोबरच खाऊचे स्टॉल, फनी गेम्स, कुल्फी यांचेदेखील आयोजन करण्यात आले होते. पालेभाज्या, फळभाज्या, फळे यांच्या विक्रीमुळे विदयार्थ्यांना वजनकाटा कसा वापरावा येथपासून ते धारकतेच्या एककाचे परस्परांमध्ये रुपांतर करण्याचे प्रात्यक्षिक या उपक्रमाद्वारे करण्याची, संधी विदयार्थ्यांना प्राप्त झाली तसेच खाऊंच्या स्टॉलमुळे पदार्थ बनवण्याचे कौशल्य त्यांच्या अंगी प्राप्त झाले तसेच फनी गेम्समुळे गेम्स तयार करणे, ते गेम्स इतरांना खेळणासाठी प्रोत्साहीत करणे, बारकाईने व अचूक निरिक्षण क्षमता हे व्यवहारासाठी असलेली कौशल्ये हाताळण्याची संधी या उपक्रमातून मिळाली.
आनंद बाजाराचे खास वैशिष्ट्य म्हणजे अगदी सुरुवातीपासून ते उपक्रमाची वेळ संपेपर्यंत पालकांचा उत्साह कायम- स्वरूपी टिकून होता. या बाजारामध्ये खरेदीसाठी पालक अगदी शेवटच्या वेळेपर्यंत येतच होते. या उपक्रमाला भेट देण्यासाठी बार्शी पोलिस स्टेशनच्या पोलिस उपनिरिक्षक सौ. सारिका गटकुळ तसेच सुपर बझार’ या बिग मॉलच्या संस्थापक सदस्या सौ. शुभांगी पाटील आवर्जून उपस्थित होत्या. या मान्यवरांचा सत्कार शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. प्रणिता जोशी व सौ आरती पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे सहशिक्षक ज्ञानेश्वर खुने यांनी केले तर आभार प्रदर्शन उमेश नायकुडे यांनी केले. आनंद बाजाराचे नियोजन करण्यासाठी मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केलेल्या ‘नियोजन समितीतील सहशिक्षक लक्ष्मण वाघमारे, वैजिनाथ मोरे, तुकाराम आगावणे, ज्ञानेश्वर खुने, विशाल बुडूख, बाळासाहेब ढ़ेंबरे, उमेश नायकडे, कुलदिप काकडे, बालाजी सौदागर, प्रसन्न पोतदार,विजय क्षिरसागर, आकाश दावणे तसेच शिक्षकेतर कर्मचारी सचिन उनवणे यांनी चांगले नियोजन केले होते. या कार्यक्रमाचे व्यवस्थापन, विदयार्थ्यांची भाजी विकण्यासाठीची बैठकव्यवस्था, विदयार्थ्यांना तराजूकाट्याचे मार्गदर्शन, भाजी विकण्याचे कौशल्य सांगण्याचे कार्य शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. प्रणिता जोशी, सौ. आरती पाटील सौ वनिता लटके सौ.जयश्री वागज, सौ. सारिका नकाते सौ. आशा घल्लाळ, ईश्वरी जोशी सौ. वसुधा हलसीकर व सौ. निर्मला माने यांनी पाहिले. या उपक्रमामुळे विदयार्थ्यांना व्यावहारिकतेचे कौशल्य मिळाल्याबद्दल पालकांनी विदयार्थ्यांचे कौतुक सर केलेच त्याबरोबरच शिक्षकांचे देखील आभार मानले.