बार्शी

विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचा वर्धापनदिन उत्साहात संपन्न वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिराचेही आयोजन

B1न्युज मराठी नेटवर्क

बार्शी : विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन चा ४४ वा वर्धापन आज ४ सप्टेंबर रोजी महावितरण विभागीय कार्यालय बार्शी येथे मोठ्या उत्साहात रक्तदान शिबिर आयोजित करून साजरा करण्यात आला .
या वर्धापन दिनाच्या निमित्ताने संघटनेचे सरचिटणीस देवकांत व केंद्रीय पदाधिकारी यांनी केलेल्या आवाहन नुसार भव्य रक्तदान शिबिर देखील आयोजित करण्यात आले होते. यावेळी विभागातील एकूण ५६ रक्त दात्यानी उत्स्फूर्त पणे रक्तदान केले.


रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रभारी कार्यकारी अभियंता धनराज भारती यांच्या हस्ते व व्यवस्थापक राजेंद्र सावंत , सहाय्यक अभियंता घोलप , कनिष्ठ अभियंता झिंगाडे ,प्रमोद गरड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
संघटनेने वर्धापनदिनानिमित्त घेतलेल्या रक्तदान शिबिराचे कौतुक करत सध्या करोनाच्या काळामध्ये सर्वत्र रक्ताची गरज असल्याचे सांगत भारती यांनी संघटनेच्या उपक्रमाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच संघटनेचे विभागीय सचिव सतीश पाटील यांनी संघटनेचा इतिहास प्रस्थावणे मध्ये सांगितला .सोलापूर मंडळ सह सचिव आर एम नेंदाने यांनी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमास बारामती परिमंडळ अध्यक्ष ओंकरणाथ गाये यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.
यावेळी प्रमुख पदाधिकारी डी बी लिंगायत , सोमेश्वर होनराव , एस डी आगळे , रमेश जगदाळे ,बळीराम कदम , भारत भोसले , अमर धस , अमित कोष्टी व इतर पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button