जेजुरीच्या खंडोबाची सोमवती यात्रा रद्द

0

B1न्युज मराठी नेटवर्क


सोलापूर : सोमवारी (दि.६) होणारी जेऊर (जि. पुणे) येथील खंडोबाची सोमवती यात्रा रद्द करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. मात्र, सोमवतीनिमित्त होणारे धार्मिक विधी परंपरेनुसार केले जाणार असल्याचेही
मंदिर समितीने सांगितले. जेजुरी पोलीस ठाण्यामध्ये गावकरी यांची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये सोमवती अमावास्या यात्रेचे नियोजन केले.

सध्या कोरोना प्रादुर्भाव असल्याने व शासनाचे निर्बंध अजून कडक असल्याने सोमवती अमावास्या यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या काळामध्ये सर्व गावातील व्यावसायिकांनी रविवार व सोमवारी
भाविकांना प्रवेश देऊ नये. बाहेर गावातील भाविकांचे बुकिंग घेऊ नये, विश्वस्त, पुजारी, मानकरी यांना असे आवाहन करण्यात आले.यात्रा काळात जमावबंदी आदेश असल्याने भाविकांनी जेजुरीत येऊ नये, असे आवाहन पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या