जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने ४९ ज्येष्ठ विधिज्ञांचे ४० तासांचे मध्यस्थी प्रशिक्षण यशस्वी

0

B1न्यूज मराठी नेटवर्क500

सोलापूर : मुख्य मध्यस्थी देखरेख समिती, मुंबई उच्च न्यायालय यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ४० तासांचा मध्यस्थी प्रशिक्षण कार्यक्रम नियोजन भवन, सोलापूर येथे समारोप समारंभपूर्वक संपन्न झाला. या प्रशिक्षणामध्ये सोलापूर, अक्कलकोट आणि मोहोळ येथील ४९ ज्येष्ठ विधिज्ञांनी यशस्वीरीत्या सहभाग नोंदविला.

समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी एम.सी.पी.सी., नवी दिल्लीचे वरिष्ठ प्रशिक्षक संजीव भालेराव होते. तर कार्यक्रमाचे आयोजक व संभाव्य प्रशिक्षक न्यायाधीश अमोलकुमार ए. देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना संजीव भालेराव यांनी सांगितले की, मध्यस्थीच्या माध्यमातून प्रलंबित वाद सामोपचाराने निकाली काढण्यास मोठी चालना मिळेल. प्रशिक्षित मध्यस्थ न्यायव्यवस्थेवरील ताण कमी करण्यास आणि वाद तडजोडीने मिटविण्यास महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अमोलकुमार ए. देशपांडे यांनी प्रशिक्षणाचा आढावा घेत सहभागींना मार्गदर्शन केले. तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष मनोज एस. शर्मा यांनी प्रशिक्षणार्थींना दिलेल्या शुभेच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.500प्रशिक्षणार्थींनी आपल्या मनोगतात ४० तासांच्या प्रशिक्षणामुळे व्यक्तिमत्त्व विकासासह व्यावसायिक कौशल्यांमध्ये भर पडल्याचे सांगितले. वकिली व्यवसायासोबत प्रशिक्षित मध्यस्थ म्हणून वाद सामंजस्याने सोडविण्यास तसेच प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

समारोप समारंभात प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व ४९ विधिज्ञांना मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षण पूर्णत्वाची प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. तसेच सोलापूर, अक्कलकोट व मोहोळ बार असोसिएशनच्या प्रतिनिधींनी उत्कृष्ट प्रशिक्षण दिल्याबद्दल वरिष्ठ प्रशिक्षक संजीव टी. भालेराव आणि अमोलकुमार ए. देशपांडे यांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.

या ४० तासांच्या मध्यस्थी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष मनोज एस. शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सचिव अमोलकुमार ए. देशपांडे यांच्या देखरेखीखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूरच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अधिक्षक एस.ए.जी.नदाफ यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या