महाराष्ट्र भूषण पुरस्काराने युवा उद्योजक बाळाजी रामलिंग माळी यांचा गौरव

0

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी/पुणे : आनंदी युनिव्हर्स फाउंडेशन आयोजित कर्तृत्ववान व्यक्तींच्या भव्य सन्मान सोहळ्यात युवा उद्योजक मा. बाळाजी रामलिंग माळी यांना प्रतिष्ठेचा “महाराष्ट्र भूषण पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले.

पुणे येथे झालेल्या या दिमाखदार पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये हॉटेल व्यवसायातून दर्जेदार सेवा, सामाजिक बांधिलकी आणि युवकांसाठी प्रेरणादायी कार्य केल्याबद्दल बाळाजी रामलिंग माळी यांची महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.500मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार स्वीकारताना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी बोलताना बाळाजी माळी यांनी हा पुरस्कार आपल्या कुटुंबीय, सहकारी आणि सर्व शुभेच्छुकांना समर्पित करत भविष्यातही समाजोपयोगी कार्य आणि प्रामाणिक व्यावसायिक सेवा अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

या सन्मानाबद्दल बार्शी तालुक्यासह मित्रपरिवार, नातेवाईक, विविध सामाजिक संघटना आणि व्यावसायिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या