सोलापूर येथे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मुख्य अभियंता कार्यालयाचे उद्घाटन

0

सिंचन योजनांना गती देण्यासाठी सोलापूर कार्यालय ऐतिहासिक पाऊल -जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

B1न्यूज मराठी नेटवर्क500

महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे अंतर्गत मुख्य अभियंता (विनिर्दिष्ट प्रकल्प), जलसंपदा विभाग, सोलापूर येथील कार्यालयाचा उद्घाटन सोहळा जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री

सोलापूर, दि. 24 : सोलापूर येथे मुख्य अभियंता (विनिर्दिष्ट प्रकल्प) कार्यालयाची स्थापना हा जलसंपदा विभागासाठी ऐतिहासिक दिवस आहे. या कार्यालयामुळे जिल्ह्यातील सिंचन योजनांच्या अंमलबजावणीला अधिक गती मिळून शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे. कार्यालय सुरू झाल्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अधिक लोकाभिमुख होऊन समर्पित भावनेने काम करावे, असे आवाहन जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

मुख्य अभियंता (विनिर्दिष्ट प्रकल्प), जलसंपदा विभाग, सोलापूर येथील कार्यालयाचा उद्घाटन प्रसंगी जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील बोलत होते. यावेळी आमदार सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, अभिजित पाटील, उत्तमराव जानकर, देवेंद्र कोठे, सोलापूर शहराचे महापौर विनायक कोंड्याल, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ, मुख्य अभियंता (विनिर्दिष्ट प्रकल्प) संजीव चोपडे, विभागीय अधिकारी, कर्मचारी, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.500यावेळी विखे पाटील म्हणाले की, भविष्यात धरणांतील पाण्याची उत्तरदायित्वपूर्ण (Accountability) व्यवस्थापन पद्धती राबविण्यात येणार असून पाणी वाटपाबरोबरच पाणीपट्टीची प्रभावी वसुलीही आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. उजनी धरणातील गाळ काढण्याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून गाळ उपसल्यामुळे जलसाठा क्षमता वाढण्यास मदत होईल. तसेच उजनी परिसरात पर्यटन विकासालाही चालना दिली जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून सोलापूर आयटी पार्कसाठी जलसंपदा विभागाची जागा उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगताना, पालकमंत्री म्हणून कार्यरत असताना आयटी पार्क, एमआयडीसी तसेच पंढरपूर येथील वारकऱ्यांसाठी मुख्य दर्शन व्यवस्था यांसारखे महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. राज्याला दुष्काळमुक्त व सिंचनयुक्त बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्याचा शासनाचा निर्धार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्य अभियंता संजीव चोपडे यांनी प्रास्ताविक करताना नव्याने सुरू झालेल्या कार्यालयाच्या कार्यक्षेत्राची माहिती दिली. त्यानंतर कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ यांनी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या विविध प्रकल्पांचा व भविष्यातील कामकाजाचा आढावा सादर केला. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी आपल्या-आपल्या मतदारसंघातील सिंचनाशी संबंधित प्रश्न मांडून सोलापूर येथे मुख्य अभियंता कार्यालय सुरू केल्याबद्दल राज्य शासन व जलसंपदा मंत्र्यांचे आभार व्यक्त केले.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या