न्याय विभागबार्शीमहाराष्ट्र

माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या बंगला परिसरातील आग लावण्याच्या प्रयत्नप्रकरणी तिन्ही आरोपींचा नियमित जामीन फेटाळला

B1न्यूज मराठी नेटवर्क500

बार्शी : आमदार दिलीप सोपल यांच्या बंगला परिसरात स्फोटक स्वरूपाचे जळते फटाके फेकून आग लावण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणातील अटक आरोपी प्रशांत उर्फ पेशा रणझुंजारे, निखिल उर्फ अंबादास भरत रणझुंजारे आणि नागेश बाळू मोहिते यांचा नियमित जामीन अर्ज बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सूरज व्ही. केंद्रे यांनी हा आदेश गुरुवार दि. १६ जुलै रोजी दिला.

या प्रकरणात यापूर्वी न्यायिक दंडाधिकारी पी. व्ही. राऊत यांनी आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर आरोपींनी नियमित जामिनासाठी अतिरिक्त सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.500सुनावणीदरम्यान आरोपींच्या वतीने ॲड. महेश जगताप यांनी बाजू मांडली. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड. दिनेश देशमुख यांनी युक्तिवाद केला, तर फिर्यादीच्या वतीने ॲड. विकास जाधव यांनी न्यायालयासमोर भूमिका मांडली. तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब जाधव यांनी तपासासंदर्भातील माहिती न्यायालयासमोर सादर केली. तसेच आरोपींनी जामीन अर्जात आपल्यावर कोणताही गुन्हेगारी पूर्वइतिहास नसल्याचा दावा केला असला, तरी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात प्रत्येकावर चार गुन्हे नोंद असल्याचे स्पष्ट झाल्याने न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.500गुन्ह्याचे गांभीर्य, तपास अद्याप सुरू असणे, काही आरोपी अद्याप फरार असणे तसेच जामिनावर मुक्त झाल्यास आरोपींकडून साक्षीदारांवर दबाव टाकणे, पुराव्यांमध्ये छेडछाड करणे किंवा तपासात अडथळा निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन न्यायालयाने तिन्ही आरोपींचा नियमित जामीन अर्ज फेटाळला.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button