प्रतिबंधित इंजेक्शनचा काळाबाजार उधळला; करमाळ्यात आरोपी अटकेत, ₹१.०६ लाखांचा मुद्देमाल जप्त

0

B1न्यूज मराठी नेटवर्क500

सोलापूर : सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने करमाळा तालुक्यात प्रतिबंधित मेफेन्टरमाईन सल्फेट (Mephentermine Sulphite) इंजेक्शन बेकायदेशीररीत्या विक्री करणाऱ्या एका आरोपीला अटक केली. आरोपीकडून १० प्रतिबंधित इंजेक्शने, मोटारसायकल आणि अँड्रॉइड मोबाईल असा एकूण ₹१,०६,७२० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी प्रतिबंधित औषधांच्या अवैध विक्रीविरोधात कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मुळे यांच्या पथकाला करमाळा-जेऊर रोड परिसरात एक इसम मोटारसायकलवरून प्रतिबंधित इंजेक्शने विक्रीसाठी आणणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली.500या माहितीच्या आधारे सापळा रचून संशयिताला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने आपले नाव शरद विष्णू शिंदे (वय २८, रा. केम, ता. करमाळा) असे सांगितले. झडतीदरम्यान त्याच्याकडून Troikaa कंपनीचे Mephentermine Sulphite Injection IP चे १० व्हायल, एक मोटारसायकल आणि एक अँड्रॉइड मोबाईल जप्त करण्यात आला.

प्राथमिक चौकशीत आरोपीकडे प्रतिबंधित औषधांच्या खरेदी-विक्रीसाठी आवश्यक असलेला कोणताही वैध परवाना किंवा कागदपत्रे नसल्याचे उघड झाले. मानवी आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या या बेकायदेशीर व्यवहाराप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १२३/२०२६ दाखल करण्यात आला असून पुढील तपास करमाळा पोलीस करीत आहेत.500ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मुळे तसेच कर्मचारी मनोज भंडारी, पंकज महिंद्रकर, सिद्राम कंटोळी, व्यंकटेश मोरे, राहुल दोरकर आणि हरिष थोरात यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.500

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या