बीजभांडवल,जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना; दि.११ पासून अर्ज स्विकारणार

0

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

छत्रपती संभाजीनगर,दि,५ : सुधारीत बीजभांडवल योजना आणि जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजन अंतर्गत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी दि.११ मे पासून अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्यासाठी दि.३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदत असून सुशिक्षीत बेरोजगारांनी अर्ज करावे,असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक करुणा खरात यांनी केले आहे.5009
सुधारीत बीज भांडवल योजना सेवा, उत्पादन आणि व्यापार व्यवसायासाठी सुधारीत बीज भांडवल योजनेअंतर्गत कर्ज घेता येते.
अर्हता- किमान ७ वी उत्तीर्ण, वयोमर्यादा – १८ ते ५० वर्ष, लाभार्थी १५ वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.

प्रकल्प मर्यादा- २५ लाख रुपये, जिल्हा उद्योग केंद्रामार्फत बीज भांडवल रक्कम १५ ते २० टक्के व ३ लाख ७५ हजार मर्यादेत ६ टक्के व्याय दराने कर्ज देण्यात येते. त्यात बॅंकेच्या कर्ज रकमेचा ७५ टक्के व अर्जदाराचा सहभाग ५ ते १० टक्के असतो.

जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनाः- सेवा उद्योग, उत्पादन उद्योगासाठी कर्ज घेता येते. अर्हता-शिक्षणाची व वयाची अट नाही, गावाची लोकसंख्या एक लाखाच्या आत असावी.

योजनेअंतर्गत उपलब्ध कर्ज-एकूण प्रकल्प किंमत २ लाखापर्यंत, सर्वसाधारण प्रवर्गासाठी २० टक्के जास्तीत जास्त ४० हजार रुपये , अनुसूचित जाती / जमातीकरीता ३० टक्के व जास्तीत जास्त ६० हजार रुपये /मर्जिन मनी म्हणून ४ टक्के व्याज दराने जिल्हा उद्योग केंद्रामार्फत कर्ज रुपाने देण्यात येते. या योजनांचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा. त्यासाठी दि.११ मे पासून अर्ज स्विकारणे सुरु होणार आहे,असे महाव्यवस्थापक करुणा खरात यांनी कळविले आहे.5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या