प्रॉपर्टीच्या वादातून सख्ख्या भावांकडून मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

0

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : शहरातील पिंपरकर प्लॉट परिसरात मालमत्तेच्या वादातून सख्ख्या भावांनीच भावावर हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. या घटनेत वैजिनाथ किसन जाधव (वय 50, व्यवसाय इलेक्ट्रिकल/फोर व्हीलर मेकॅनिक) हे जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वैजिनाथ जाधव हे पत्नी व मुलासह बार्शीत वास्तव्यास असून मेकॅनिक व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या कुटुंबीयांनी एकत्रित कमाईतून बार्शी शहरात विविध ठिकाणी मालमत्ता खरेदी केली होती. मात्र, त्या मालमत्तेच्या वाटणीवरून त्यांचे भाऊ नवनाथ किसन जाधव व जगन्नाथ किसन जाधव यांच्याशी वारंवार वाद होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.5000दि. १ मे २०२६ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास कुडूवाडी रोड, जैन मंदिराजवळील “रुबाब कलेक्शन” दुकानासमोर वैजिनाथ जाधव उभे असताना, नवनाथ जाधव, जगन्नाथ जाधव व अभय जगन्नाथ जाधव हे तिथे आले. “प्रॉपर्टीचे दोन हिस्से का करू देत नाहीस?” या कारणावरून वाद घालत नवनाथ जाधव यांनी स्टीलच्या पाईपने त्यांच्या डाव्या पायाच्या पिंडरीवर, मांडीवर व कमरेवर वार केले.त्यानंतर तिघांनी मिळून त्यांच्या चेहऱ्यावर व डोळ्यावर बुक्क्यांनी मारहाण करत त्यांना जखमी केले व शिवीगाळ करत तेथून पसार झाले.

घटनेनंतर जखमी अवस्थेत वैजिनाथ जाधव यांनी दुकानातील कामगाराला संपर्क साधला. त्यानंतर त्यांना प्रथम ग्रामीण रुग्णालय, बार्शी येथे आणि पुढे जगदाळे मामा हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून ते शुद्धीवर आहेत.5000या प्रकरणी संबंधित तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 352 व 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या