दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाने शोककळा मुख्यमंत्री फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुटुंबियांचे केले सांत्वन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा पसरली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करून नागपूरमधील खामला येथील मेघे निवासस्थानी जाऊन दत्ताभाऊ मेघे यांचे अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी राज्यमंत्री अॅड आशिष जयस्वाल, आमदार चरणसिंह ठाकूर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.5000दत्ताभाऊ मेघे यांनी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात भरीव कामगिरी करत ग्रामीण भागात शैक्षणिक संस्थांचे मोठे जाळे उभे केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या. सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून आयुष्यभर समाजासाठी कार्य करणाऱ्या या लोकनेत्याच्या निधनाने मोठी हानी झाल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या