श्रावस्ती बुद्ध विहार बार्शी येथे वधू वर परिचय मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

0

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

बार्शी : मातोश्री रमाई वधू वर परिचय मेळावा प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने श्रावस्ती बुद्ध विहार बार्शी येथे वधू-वरांचा परिचय मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. यामध्ये ट्रस्टकडे 250 बायोडाटा नाव नोंदणी करण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात 65 मुला-मुलींनी सहभाग घेऊन नव वधू-वरांचा शोध परिचयाच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केला. वधू वर सूचक मेळाव्याचे हे दुसरे वर्ष आहे.50000कार्यक्रमाची सुरुवात प्रथम तथागत गौतम बुद्ध, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई व मा.कांशीराम यांच्या प्रतिमांचे दिपाने,धुपाने व पुष्पाने पुजन भन्ते सुमेधजी नागसेन,भन्ते विमल किर्ते बिहार व प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्य अध्यक्ष विष्णू कांबळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.50000

मातोश्री रमाई महिला मंडळाच्या उपाध्यक्षा विश्रांता काळेगावकर,खजिनदार वैशाली कांबळे, अर्चना कसबे,सदस्या रंजना बोकेफोडे यांनी त्रिशरण व पंचशील घेण्यासाठी भंतेजींना याचना केल्यानंतर त्रिशरण पंचशील म्हणण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ.टी.एस.मोरे यांनी केले. भन्ते सुमेधजी नागसेन व भन्ते विमल किर्ते यांच्या धम्मदेसने नंतर प्रबुद्ध भारत चॅरिटेबल ट्रस्टचे जेष्ठ सदस्य प्राध्यापक एस. एस.शिंदे सर यांनी त्यांच्या मातोश्री कलावती शिंदे यांच्या स्मरणार्थ श्रावस्ती बुद्ध विहारास अहुजा कंपनीचा दर्जेदार असा संपूर्ण स्पीकर संच भेट देण्यात आला.

या निमित्ताने स्पीकर संच याचा लोकार्पण सोहळा भंते नागसेन,भन्ते विमल किर्ते व शिंदे कुटूंबियांच्या हस्ते केल्यानंतर ट्रस्टच्या वतीने शिंदे कुटुंबीयांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. दुसऱ्या सत्रात भोजनानंतर उपस्थित नियोजित वधू-वरांनी आपला स्वतःचा परिचय करून दिला. सर्वांनी आपआपसात चर्चा केल्यानंतर उपस्थित सर्वांचे आभार ट्रस्टचे अध्यक्ष विष्णू कांबळे यांनी मानले.50000या कार्यक्रमा वेळी माजी मुख्याध्यापक प्रकाश पालखे यांनी ₹११०००/- माजी केंद्रप्रमुख श्रीहरी गायकवाड यांनी रु १००० /-व भोईंजे गावच्या सरपंच यांनी रु ५००/- ट्रस्टला देवून कुशल पुण्यकर्म केले. वधु वर परिचय मेळाव्याच्या नियोजनासाठी ट्रस्टचे सहसचिव प्रा. अशोक वाघमारे,खजिनदार प्रा. शशिकांत गायकवाड, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा टी. एस. मोरे,सदस्य मधुकर पालखे सुनील कांबळे, नागनाथ सोनवणे, सुदर्शन ओहोळ विक्रम सुरवसे, इंजी.सुरज गायकवाड, अविनाश काळेगावकर, पांडुरंग शिंदे, चंद्रमणी डोकेफोडे, दत्ता शिंदे, राम कसबे, बौद्धाचार्य जगदीश भालेराव, बाबासाहेब वाघमारे, पत्रकार भोसले प्रा. जयद्रथ गायकवाड, संजय लंकेश्वर, बाळासाहेब कदम व इतर सन्माननीय सदस्य यांनी या परिचय मेळाव्यासाठी उत्तम असे सहकार्य केले.

आचारी प्रवीण कदम यांनी उत्कृष्ट भोजन बनवून दिले. मंडपवाले भैय्या गायकवाड यांनी मोलाची मदत केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागनाथ सोनवणे यांनी केले.या परिचय मेळाव्यास सोलापूर, लातूर, धाराशिव, ठाणे, पुणे, इंदापूर लऊळ, तुळजापूर, बार्शी शहर तालुका जिल्ह्यातील नियोजित वधू-वर परिचय मेळाव्यास त्यांच्या आई-वडिलांसह मोठ्या संख्येने नातेवाईक उपस्थित होते. ट्रस्टी कडून सर्वांचे आभार व्यक्त करून सर्वांना भावी जोडीदार निवडण्यासाठी शुभेच्छा दिल्या.5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या