निवडबँकिंगमहाराष्ट्रसत्कार

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सेवकाच्या पतसंस्थेच्या चेअरमनपदी राजेंद्र पवार, व्हाईस चेअरमनपदी नाना सातपुते यांची बिनविरोध निवड

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सेवकांच्या सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी मोहोळ येथील राजेंद्र पवार यांची, तर व्हाईस चेअरमनपदी बार्शीचे नाना सातपुते यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सोलापूर येथे पार पडलेल्या संस्थेच्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली.
या निवड प्रक्रियेवेळी संस्थेचे सर्व संचालक उपस्थित होते. निवडीनंतर व्हाईस चेअरमनपदी निवड झालेल्या नाना सातपुते यांचा माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
5000यावेळी बँकेच्या बार्शी मार्केट यार्ड शाखेचे शाखा अधिकारी राहुल खुने, पोपट विधाते, श्रीधर करडे, प्रवीण गवळी, संजय शिंदे, शाहबुद्दीन मुलानी, सोमनाथ क्षिरसागर, तसेच सचिव संघटनेचे अध्यक्ष दत्तप्रसाद पाटील यांच्यासह बार्शी व सोलापूर जिल्ह्यातील संस्थेचे सभासद उपस्थित होते.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button