नव तेजस्विनी महोत्सवाचे अप्पर जिल्हाधिकारी गणेश नि-हाळी यांच्या हस्ते उद्घाटन

0

जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

प्रदर्शनात एकूण 36 स्टॉल उभारण्यात आले असून त्यात खाद्यपदार्थांसह दैनंदिन वापराच्या वस्तूंची विक्री सुरू आहे.

सोलापूर दि. 23 : मावीमच्या 51 व्या वर्धापन दिनानिमित्त नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत महिला बचत गट उत्पादित विविध वस्तू व खाद्यपदार्थ विक्री आणि प्रदर्शनाचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी गणेश नि-हाळी यांच्या हस्ते झाले.

या प्रसंगी जिल्हा समन्वय अधिकारी मन्सूर पटेल, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक नितीन शेळके, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा माविमचे राजकुमार पवार, विभागीय व्यावसाय सल्लागार सिद्धाराम माशाळे, तालुका व्यवस्थापक रणजित शेंडे व माविम अधिकारी प्रशांत गायकवाड उपस्थित होते.5000उद्घाटन प्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी गणेश नि-हाळी यांनी महिलांना शुभेच्छा देताना सांगितले की, पुढील दोन दिवसांत मी स्वतः माझ्या कुटुंबासह येथे येऊन खाद्यपदार्थांचा आस्वाद घेईन. उपस्थितांनीही स्टॉलला भेट देऊन महिलांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.5000या महोत्सवात महिला बचत गटांना बँकांच्या माध्यमातून मोठे आर्थिक पाठबळ मिळाले. बँक ऑफ इंडिया कडून 24 गटांना एकूण 1 कोटी 76 लाखांचे धनादेश, बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे कामधेनू व राजमाता गटांना 1 कोटी 14 लाखांचे धनादेश तर आयसीआयसीआय बँकेतर्फे 105 स्वयंसहायता महिला बचत गटांना तब्बल 4 कोटी 50 लाखांचे धनादेश वितरण करण्यात आले.5000प्रदर्शनात एकूण 36 स्टॉल उभारण्यात आले असून त्यात खाद्यपदार्थांसह दैनंदिन वापराच्या वस्तूंची विक्री सुरू आहे. महिलांच्या उद्यमशीलतेला चालना देणारा हा उपक्रम स्वावलंबनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरेल तर धनादेशातून मिळालेले हे पाठबळ महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे माविमच्या वतीने सांगण्यात आले.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. महिलांनी सामूहिक गीत गायन करून वातावरण भारावून टाकले.5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या