बार्शीचा अभिमान प्रा. डॉ.राहुल पालके यांचे गेट परीक्षेत यश

0

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

बार्शी : ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूट टेस्ट इन इंजिनिअरिंग (GATE) गुवाहाटी २०२६ परीक्षेत प्रा. डॉ.राहुल भगवान पालके यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. ह्यूमॅनिटीज ॲण्ड सोशल सायन्सेस (Humanities and Social Sciences XH) विभागातील इंग्लिश (C2) या विषयात त्यांनी ४०.६७ गुण मिळवत अखिल भारतीय स्तरावर १२३३ वा क्रमांक पटकावला आहे. त्यांना एकूण ३६१ गेट स्कोअर प्राप्त झाला आहे.50000सध्या ते श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी येथे इंग्रजी विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. आपल्या अभ्यासू वृत्ती आणि सातत्यपूर्ण परिश्रमांमुळे त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

विशेष म्हणजे राहुल पालके यांनी विविध स्पर्धा परीक्षा आणि अभ्यासक्रमांमध्ये २० वेळा ८ वेगवेगळ्या विषयांत उत्तीर्ण होण्याचा अनोखा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे विद्यार्थी वर्गासाठी ते प्रेरणास्थान ठरत आहेत.50000त्यांच्या या यशाबद्दल श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शीचे अध्यक्ष डॉ. बी. वाय.यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, सचिव पी. टी. पाटील, सहसचिव ए.पी. देबडवार, खजिनदार व सांस्कृतिक विभाग प्रमुख बापूसाहेब शितोळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए बी शेख, इंग्रजी विभागप्रमुख डॉ. समाधान पवार, सहकारी व कर्मचारी,कुटुंबीय व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. भविष्यात विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करीत उच्च शिक्षण व संशोधन क्षेत्रात अधिक प्रगती करण्याचा त्यांचा मानस आहे.50000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या