वैराग पोलिसांची दमदार कामगिरी विहीरीवरील मोटार व केबल चोरी प्रकरणी दोन आरोपी अटकेत, ८९ हजारांचा मुद्देमाल जप्त

0

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

वैराग : सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील वैराग पोलीस ठाणे हद्दीत शेतक-यांच्या विहिरीवरील इलेक्ट्रॉनिक पाण्याच्या मोटारी व केबल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास आले होते. सदर प्रकार गांभीर्याने घेऊन पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी व कर्मचा-यांना विशेष सूचना देऊन अशा गुन्ह्यांचा उलगडा करण्याचे निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव व पो हवा भोरे यांनी केलेल्या कौशल्यपूर्ण तपासातून आरोपी नामे विशाल श्याम जाधव (रा. साठे नगर, धाराशिव) यास ताब्यात घेण्यात आले. 50000चौकशीदरम्यान त्याने शेतक-यांच्या विहिरीवरील इलेक्ट्रॉनिक पाण्याच्या मोटारी व केबल चोरी केल्याची कबुली दिली व चोरी केलेला मुद्देमाल काढून दिला.50000सदर गुन्ह्याचा पुढील तपास करत असताना आरोपीचा साथीदार समीर अल्ताफ सय्यद (रा. समर्थ नगर, धाराशिव) यास ताब्यात घेऊन अधिक चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्याने वैराग पोलीस ठाणे हद्दीतील विहीरीवरील पाण्याच्या मोटारी व केबल चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींकडून ६ इलेक्ट्रॉनिक पाण्याच्या मोटारी व सुमारे ४०० केबल असा एकूण ८९,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरातील शेतकरी वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत असून अशा प्रकारच्या चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होणार आहे.5000सदरची कारवाई अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, अशोक सायकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, बार्शी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक प्रतापसिंह जाधव, पोलीस हवालदार भोरे, पोलीस कॉन्स्टेबल आकाश पवार व राहुल पाटील यांनी केली आहे.5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या