सोलापूर जिल्ह्यात गॅस वितरण सुरळीत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे पाऊल; तक्रारीसाठी हेल्पलाईन जाहीर

0

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

​बार्शी : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे सोलापूर जिल्ह्यात गॅसचा तुटवडा जाणवत असल्याची शक्यता लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने गॅस वितरण प्रणालीवर कडक देखरेख ठेवण्यास सुरुवात केली आहे.

गॅस सिलिंडर वेळेवर न मिळणे किंवा वितरणामध्ये अडथळा आल्यास नागरिकांना आता थेट जिल्हाधिकारी कार्यालयातील २४x७ आपत्कालीन कक्षाशी संपर्क साधता येणार आहे.50000जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी जनतेला आवाहन केले आहे की, पेट्रोल, डिझेल किंवा घरगुती गॅसचा तुटवडा भासणार नाही याची प्रशासन काळजी घेत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अतिरिक्त साठा करू नये.50000

महत्वाचे संपर्क क्रमांक:
​जिल्हा आपत्कालीन कक्ष: ०२१७-२७३१०१२
​बार्शी तालुका संपर्क: निलेश आठवले (७२१८९८१३४४) / संतोष शिंदे (९५१८५६२५३२)

500000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या