‘भोंगेमुक्त’ बार्शीच्या दिशेने पहिले पाऊल; पोलिसांनी धार्मिक स्थळांवरील २२ अनधिकृत भोंगे हटवले

0

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : काही दिवसांपूर्वी शहरात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बार्शी शहर पोलिसांनी शहरातील धार्मिक स्थळांवरील अनधिकृत ध्वनिक्षेपक (भोंगे) काढून टाकण्याची विशेष मोहीम यशस्वीपणे राबवली. या कारवाईमुळे बार्शी शहर ‘भोंगेमुक्त’ होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.

मागील काही दिवसांपूर्वी बार्शी पोलिस ठाण्यात शांतता समितीची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत सर्व धर्मीय प्रार्थनास्थळांवरील भोंगे काढण्याबाबत चर्चा झाली आणि संबंधित मार्गदर्शन देण्यात आले. तसेच, २२ फेब्रुवारी २०२६ रोजी शहरात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी शांतता समितीची पुन्हा बैठक घेऊन धार्मिक स्थळांवरील भोंगे हटविण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते.50000या आदेशाची अंमलबजावणी करताना आज, २८ फेब्रुवारी २०२६ रोजी बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत शहरातील १३ मशिदी, १ मदरसा व ५ मंदिरांवरील २२ भोंगे हटविण्यात आले. या कारवाईमुळे बार्शी शहर भोंगेमुक्त होण्याच्या दिशेने पहिले पाऊल पडले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. मोहिमेत पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दोरे, पोलीस हवालदार महेश गळटे, सोनम जगताप, पोलीस अंमलदार अजित वर्पे यांच्यासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. शहरवासीयांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून, शांततेसाठी ही पावले महत्त्वाची ठरतील अशी आशा नागरिक व्यक्त करत आहेत.5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या