निवडबार्शीमहाराष्ट्र

वैराग च्या प्राची शाम गोवर्धन हिची कृषी उपसंचालक पदावर निवड

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : वैराग येथील कु. प्राची शाम गोवर्धन हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत घेण्यात आलेल्या कृषि सेवा २०२४ परीक्षेत महाराष्ट्रातून १४ वा क्रमांक मिळवून तसेच EWS महिला प्रवर्गातून प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिची कृषि उपसंचालक (वर्ग १) या मानाच्या पदावर निवड झाली आहे.

प्राचीचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण वैराग येथील विद्यामंदिर कन्या प्रशाला येथे झाले. त्यानंतर तिने महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून एम.एस्सी. (ऍग्रोनॉमी) पदवी संपादन केली. शैक्षणिक कारकिर्दीत सातत्य, जिद्द आणि परिश्रम यांच्या जोरावर तिने हे यश मिळवले आहे.

प्राचीचे वडील शाम गोवर्धन हे श्री साई औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सासुरे येथील प्राचार्य असून आई वर्षा गोवर्धन या वैराग प्राथमिक आरोग्य केंद्रात आशा गटप्रवर्तक म्हणून कार्यरत आहेत. कुटुंबाच्या पाठबळामुळे आणि स्वतःच्या अथक प्रयत्नांमुळे प्राचीने हे उज्ज्वल यश संपादन केले आहे.50000

तिच्या या दैदिप्यमान यशाबद्दल वैराग, बार्शी परिसरासह संपूर्ण जिल्ह्यातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिच्या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button