मधुबन ट्रॅक्टर्स, बार्शी येथे होणार नवीन अत्याधुनिक 3036EN ट्रॅक्टर व MAT (मल्टि ॲप्लिकेशन टीलेज) या अवजार चे अनावरण

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : जगविख्यात कंपनी जॉन डियर इंडिया प्रा. लि. चे अधिकृत वितरक मधुबन ट्रॅक्टर्स, बार्शी येथे शनिवार दि.21/05/2022 रोजी स. 10 वा. नवीन अत्याधुनिक 3036EN ट्रॅक्टर चे व अंतर्गत मशागतीचे अष्टपैलू अवजार ( मल्टि ॲप्लिकेशन टिलेज) या अवजाराचे अनावरण जॉन डियर इंडिया प्रा. ली. च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती मधुबन उद्योग समूहाचे चेअरमन मा. प्रविण कसपटे यांनी दिली.
नवीन 3036EN ट्रॅक्टर मधे शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन नावीन्यपूर्ण बदल करण्यात आले आहेत. जमिनी पासूनचे अंतर या मध्ये पूर्वीच्या तुलनेत दुप्पट आहे तसेच उंची 2 इंच कमी केली आहे व अधिक रुंद टायर मुळे स्लीपेज चे प्रमाण कमी आहे.
या कार्यक्रमास उपस्थित राहून अधिकाधिक शेतकरी तसेच जॉन डियर चे जुने ग्राहक यांनी अधिक माहिती घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन मधुबन ट्रॅक्टर्स टीम चे मार्गदर्शक श्री माणिक हजारे यांनी केले आहे.