बार्शीसामाजिक

डिजिटल युगात तरूणाई हरवू पाहत आहे : गणेश शिंदे

B1न्यूज मराठी नेटवर्क

रेङ अलर्ट फायर सिस्टीम वतीने गणेश शिंदे यांना अग्निशमन उपकरण भेट!

बार्शी : कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे यांच्या १२० वी जयंतीनिमित्त ” जीवन सुंदर आहे ” या विषयावर व्याख्याते गणेश शिंदे यांना आमंत्रीत करण्यात आले . मामांच्या आठवणीतून सुरूवात करत मामांच्या विचारांची नवी शिदोरी मुलां, मुलीना तसेच शिक्षक, शिक्षकेतर यांना देण्यात आली. मामांच्या आदर्श व्यक्तिमत्व निस्वार्थी जीवन , समाज कार्यासाठी वेचलेले उभं आयुष्य यातून उभा राहिलेले शैक्षणीक संकुल व जगदाळे मामा रूग्णालय महाराष्ट्राला नव्हे तर देशात आदर्शाची उंची वाढविणारी संस्था असा नावलौकीक आहे.आज जीवन सुंदर आहे यात अभ्यास, ज्ञान , अवलोकन विचार व व्यक्तिमत्व याची सुंदर सांगङ घालत आनंद व समाधान हाच प्रत्येकाच्या आयुष्याचा गोङ सार्थक असते. जे आपले संपुर्ण जीवन सुंदर बनवते. आजकाल मुले व मुली ही तरूणाई ङिजीटल दुनियेत हारवू पहात आहे. परंतु लेखन , भाषण साहित्य याचा गाभा हा अमर आहे. तो कोणत्याही तंत्रज्ञानाने संपणार नाही याची पुष्टी आजच्या मार्गदर्शनात अभ्यास , ज्ञान विचार हेच जीवनाला सुंदर बनवतात हे पैशाने कधिही खरेदी करता येणार नाहीत . हा गाभार्थ गणेश शिंदे यांनी अतिशय ऋदयस्पर्षी मांङला व तो प्रेक्षकांच्या हदयात इतका बिंबला की उपस्थित मुला मुलींचे ङोळे आश्रूंनी भरले . आज अतिशय सुंदर कार्यक्रम झाल्याचे उपस्थितांनी भावना व्यक्त केल्या.यावेळी रेड अलर्ट फायर सिस्टीमच्या वतीने व्याख्याते गणेश शिंदे यांना अग्निशमन उपकरण भेट देण्यात आले. या वेळी अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव ,उपाध्यक्ष नंदन जगदाळे , भालके ,प्राचार्य चंद्रकांत मोरे , अरुण देबङवार , किरण गाढवे, घळके , आदी उपस्थित होते. विचारांचे संरक्षण झाले पाहिजे व अशा वक्त्यांचे संरक्षण माझ्या कङून ही व्हावे अशी भावना या वेळी उपस्थित जी. एम. दिवटे यांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button