उद्घाटनउद्योगमहाराष्ट्ररायगड

उद्योजकीय क्षेत्रामधील महिलांच्या उत्तुंग भरारीचे कौतुक – अपर जिल्हाधिकारी सचिन ढोले

B1न्यूज मराठी नेटवर्क500

रायगड-अलिबाग,दि.3 : भारतीय उद्योजकता विकास संस्था (ईडीआय) अहमदाबाद द्वारा पुरस्कृत व टाटा कम्युनिकेशन्स मुंबई द्वारा प्रायोजित महिलांच्या वस्तूला मार्केटिंग लिंकेज मिळण्यासाठी प्रकल्प उदया अंतर्गत उदया बाजार अलिबाग आऊटलेट स्टोअर्सचे उद्घाटन टाटा कम्युनिकेशन मुंबईचे उपाध्यक्ष कॅप्टन अखिलेश सक्सेना तसेच अप्पर जिल्हाधिकारी सचिन ढोले यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी ईआय प्रकल्प संचालक डॉ.प्रकाश सोळंकी, जिल्हा उद्योग केंद्राचे सहाय्यक आयुक्त जी.एस.हरळया, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक सुधीर गायकवाड, बँक ऑफ इंडिया झोनलहेड विजयकुमार कुलकर्णी उपस्थित होते.500प्रकल्प उदया अंतर्गत महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मध्ये कायमस्वरूपी मागणी वाढावी तसेच महिला व दिव्यांग उद्योजकांना त्यांच्या हक्काची बाजारपेठ उपलब्ध होऊन त्यांचा आर्थिकस्तर उंचवावा या उदात्त हेतूने टाटा कम्युनिकेशन्स च्या सामाजिक दायित्व विभागांतर्गत रायगड जिल्ह्यातील महिला व दिव्यांग व्यक्तींकरिता उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

उदया प्रकल्पांतर्गत रायगड जिल्ह्यामध्ये महिला उद्योजकता असोसिएशन तयार करण्याचा मानस ईडीआय प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश सोळंकी यांनी विशद केला. रायगड जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या प्रकल्प उदयाबाबत सविस्तर माहिती भारतीय उद्योजिका विकास संस्था अहमदाबाद प्रकल्प संचालक डॉ.प्रकाश सोळंकी यांनी दिली. या कार्यक्रमाला रायगड जिल्ह्यातील महिला उद्योजिका उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन इंडिया प्रकल्प अधिकारी शशिकांत दनोरीकर यांनी केले.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button