निवडबार्शीमहाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट बार्शी ओबीसी शहराध्यक्ष पदी नितीन भोसले यांची नियुक्ती

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या बार्शी ओबीसी विभाग शहराध्यक्षपदी नितीन भोसले यांची नियुक्ती करण्यात आली. दिनांक 10 जून रोजी पक्षाच्या 26 व्या वर्धापनदिनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष राजापूरकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.यावेळी तालुक्याचे नेते विश्वास भाऊ बारबोले ,निरंजन भूमकर ,कृष्णराज बारबोले,महिला जिल्हाअध्यक्ष सुवर्णा शिवपुरे,जिल्हाउपाध्यक्ष इक्बाल पटेल ,विधानसभा अध्यक्ष भारत देशमुख व शहर अध्यक्ष किरण देशमुख उपस्थित होते .

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी देण्यात आले. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , बळीराम काका साठे,धैर्यशील मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटना मजबूत करण्याचा हे उल्लेख पत्रामध्ये करण्यात आला आहे. यावेळी नितीन भोसले यांनी सांगितले की, पक्षाच्या नेतृत्वाने दिलेले सर्व आदेश पाळून पक्ष संघटना बार्शी तालुक्यामध्ये वाढविण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. तसेच ओबीसी संवर्गातील सर्व जातीपातींना एकत्र घेऊन त्यांची एक मोट बांधण्याचा प्रयत्न करेन अशी भोसले यांनी ग्वाही दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button