नाशिकमहाराष्ट्र

श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे नाशिकमध्ये भावपूर्ण स्वागत

B1न्यूज मराठी नेटवर्क

नाशिक : श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी १२ जून रोजी सकाळी नाशिक शहरात दाखल होताच, विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम व नाशिक महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक सौ. मनिषा खत्री यांनी पालखीचे स्वागत करून भावपूर्ण दर्शन घेतले.

“रामकृष्ण हरी, जयहरी विठ्ठल माऊली”च्या गजरात जिल्हाधिकारी जलज शर्मा व आयुक्त मनिषा खत्री यांनी टाळ वाजवत पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या वारीत सहभाग नोंदवला. या पावन वारीमध्ये मनपाचे सर्व अधिकारी श्रद्धेने सहभागी झाले.

अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, उपआयुक्त लक्ष्मीकांत साताळकर, नितीन पवार, शहर अभियंता संजय अग्रवाल, कार्यकारी अभियंता सचिन जाधव, नितीन पाटील, संदेश शिंदे, नितीन राजपूत, गणेश मैदड, रवी बागुल, प्रशांत बोरसे, जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button