बार्शीमहाराष्ट्ररस्ते विभाग

कांदलगाव येथील रस्त्याच्या भूमिपूजनला आलेल्या पालकमंत्र्यांनी माजी आ. राजेंद्र राऊत यांचा शब्द पूर्ण करत व तेथील पुलाच्या कामासाठी 4 कोटी निधी मंजूर

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : ६ मे रोजी पालकमंत्री जयकुमार गोरे बार्शी दौऱ्यावर आले होते. पालकमंत्री बार्शी दौऱ्यावर असताना कांदलगाव येथे पंतप्रधान ग्राम सडक योजना अंतर्गत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन समारंभामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे मा.राजाभाऊ राऊत यांनी बार्शी कांदलगाव रस्त्यावरील पुल मंजूर करण्याची मागणी केली होती.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कार्यक्रम मध्येच पुल मंजूर केला असा शब्द मा. राजाभाऊ राऊत व गावकऱ्यांना दिला होता. दिलेला शब्द पूर्ण करत सदर पुलाच्या कामासाठी शासनाच्या वतीने ४ कोटी रुपये मंजूर केले आहेत. पालकमंत्री यांनी बार्शी तालुक्यातील अधिकार राजाभाऊ राऊत यांच्याकडे दिल्याचे भाषणात सांगितले होते त्याचा प्रत्यय या कामाच्या निमित्ताने आल्याची चर्चा बार्शी तालुक्यात चालू आहे.

बार्शी – कांदलगाव – शिरसाव रस्त्यावरील पुलासाठी 4 कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , ग्रामविकास मंत्री तथा पालक मंत्री जयकुमार गोरे व महायुती सरकार चे आभार राजाभाऊ राऊत व गावकऱ्यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button