इच्छा शक्ती असली की सर्व काही शक्य होत….प्रत्येकाने आपलं काम प्रामाणिकपणे करण ही सुद्धा देश सेवाच आहे – रोहन देशमुख युवा उद्योजक

प्रार्थना फाऊंडेशनच्या कृतिशील तरुणाई शिबिराचा समारोप….
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : आजच्या तरुण पिढीने देशाला सक्षम बनवण्यासाठी कृतिशील राहणं गरजेचं आहे.स्वतःमध्ये आत्मविश्वास व इच्छा शक्ती असली की सर्व काही शक्य होऊ शकत.आपण ज्या क्षेत्रात काम करतो मग भले ते क्षेत्र कोणतंही असो तिथे भ्रष्टाचार न करता प्रामाणिकपणे काम करत राहिल तर ती सुद्धा एक देश सेवाच आहे असे मत युवा उद्योजक रोहन देशमुख यांना यावेळी व्यक्त केले.
प्रार्थना फाऊंडेशन व सेवादाई सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून मोरवंची येथे कृतिशील तरुणाई शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराच्या समारोप कार्यक्रम प्रसंगी ते तरुणांशी संवाद सादत होते.
युवकांनी नोकरीच्या मागे न धावता उद्योग क्षेत्रात येन गरजेचं आहे.उद्योग क्षेत्रात खूप संधी उपलब्ध आहेत.आपण स्वतः उद्योजक बनून इतरांना ही कामाची संधी उपलब्ध करून देऊ शकतो असे मत अमित जैन यांनी यावेळी व्यक्त केलं मोरवंची येथे पार पडलेल्या तिसऱ्या कृतिशील तरुणाई शिबिरात राज्यभरातून तरुण सहभागी झाले होते. या तरुणाईला आर्थिक,सामाजिक,मानसिक, बौद्धिक दृष्टीने कृतिशील व सक्षम बनवण्यासाठी विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
यावेळी शिबिरार्थ्यांनी आपले शिबिरातील अनुभव ही व्यक्त केले.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिबिरार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
कृतिशील तरूणाई सबिराच्या समारोप प्रसंगी अमित जैन, सूर्यभान धोत्रे,PSI प्रमोद मेरड,अभिनंदन गायकवाड महाराज,मनीषा सरवळे,विष्णू भोसले,साहिल तुपे तर प्रार्थना फाऊंडेशनचे अनु मोहिते,शुभम मिसाळ,पांडुरंग तुपसमुद्रे,इरफान मुलानी,गणेश डुरे आदी मान्यवर उपस्थित होते.