निवडबार्शीमहाराष्ट्र

श्र्वेतांबर स्थानकवासी राज्य कार्यकारिणी सदस्यपदी अजित कुंकूलोळ

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : श्री.ऑल इंडिया श्र्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्सच्या (नवी दिल्ली) महाराष्ट्र प्रांत संघटनेच्या राज्य कार्यकारिणी सदस्यपदी येथील सामाजिक कार्यकर्ते अजित सुरेशचंद्र कुंकूलोळ यांची सन २०२५ ते २०२७ या कालावधीसाठी निवड करण्यात आली.

या निवडीचे पत्र श्री. ऑल इंडिया श्र्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्सचे (नवी दिल्ली) अध्यक्ष मोहनलाल लोढा व सचिव शांतीलाल दुगड यांनी दिले आहे. कुंकुलोळ यांनी जैन समाजासाठी आज अखेर केलेले कार्य व मागील सुमारे तीस वर्षाचा सामजिक कार्याचा प्रदीर्घ अनुभव याची दखल घेत कुंकुलोळ यांची जैन कॉन्फरन्सच्या राज्य कार्यकारिणी सदस्य पदी निवड करण्यात आली आहे.

कुंकुलोळ यांनी यापूर्वी ५ वर्ष वर्धमान जैन स्थानक बार्शीचे अध्यक्ष तर ४ वर्ष जैन कॉन्फरंस संघटनेवर यापूर्वी राज्य पदाधिकारी म्हणून काम केले आहे. तसेच जीवन ज्योत संघटना संस्थापक अध्यक्ष, व्हॉईस ऑफ मीडिया राज्य उपाध्यक्ष , इंडियन रेड क्रॉस सोसायटी सचिव , रामभाई शाह ब्लड बँक उपाध्यक्ष म्हणून काम करत आहेत. या निवडी बद्दल अजित कुंकुलोळ यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button