निवडबार्शीमहाराष्ट्र

नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीसच्या बार्शी शहर व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची निवडी जाहीर

शोषित, वंचित आणि दुर्बल घटकांसाठी न्याय मिळवण्याचा निर्धार

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : अनुसूचित जाती आणि वंचित घटकांच्या हक्कासाठी लढणाऱ्या नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस (NDMJ) या सामाजिक संघटनेच्या बार्शी शहर व तालुका कार्यकारिणीची निवड नुकतीच करण्यात आली. ही निवड दि. २८ जून २०२५ रोजी बार्शी येथील सावळे सभागृहात झाली. कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य सचिव वैभव गीते यांची उपस्थिती लाभली होती. निवडीची घोषणा जिल्हाध्यक्ष पंकजकुमार काटे यांच्या हस्ते करण्यात आली.50000

या निवडींमध्ये बार्शी शहर अध्यक्षपदी ॲड. प्रसन्नजित नाईकनवरे यांची निवड झाली. तर उपाध्यक्षपदी धीरज भोसले, सचिव सुमित खुरंगळे, कार्याध्यक्ष अजय वाघमारे, संघटक श्रीकांत कांबळे, प्रसिद्धीप्रमुख सचिन लोकरे, समन्वयक अंदमान गायकवाड, विधी सल्लागार ॲड. सचिन किरतकर्वे व ॲड. अक्षय बीडबाग यांची निवड झाली. खजिनदारपदी मिलिंद भालेराव यांची नियुक्ती करण्यात आली. तर सदस्य म्हणून कपिल बोकेफोडे व धनंजय बोकेफोडे यांची निवड झाली.

यावेळीच बार्शी तालुका कार्यकारिणीचीही घोषणा करण्यात आली. तालुका अध्यक्षपदी सनी गायकवाड, उपाध्यक्ष प्रवीण आखाडे, सचिव सूर्या मस्के, कार्याध्यक्ष अमित गायकवाड, संघटक बबलू चौधरी, प्रसिद्धीप्रमुख लखन बनसोडे, विधी सल्लागार ॲड. मिलिंद बनसोडे व ॲड. स्वप्निल खंडागळे आणि खजिनदारपदी रोहित लोंढे यांची नियुक्ती करण्यात आली.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button