महिलांच्या सन्मानासाठी, सशक्तीकरणासाठी – रायगड पोलीस विभागाचा स्तुत्य उपक्रम!

B1न्यूज मराठी नेटवर्क
रायगड : पोलीस विभागाच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्याचा योग आला. या विशेष कार्यक्रमात दहा कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करून त्यांच्या योगदानाला गौरवण्यात आले.
महिला दिन हा केवळ उत्सव नाही, तर स्वतःच्या अस्तित्वाचा आणि कर्तृत्वाचा अभिमान बाळगण्याचा दिवस आहे. मुलगी, बहीण, सून, पत्नी आणि आई अशा जबाबदाऱ्या पार पाडताना महिलांना स्वतःच्या ओळखीला संघर्ष करावा लागतो. समाजात महिलांना केवळ जबाबदाऱ्यांची जाणीव करून देण्याऐवजी त्यांच्या आत्मसन्मानाला आणि स्वतंत्र अस्तित्वाला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.
रायगड पोलीस विभागाने महिलांसाठी हा दिवस खास बनवण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला ज्यामुळे महिलांना एकत्र येऊन अनुभवांची देवाणघेवाण करण्याची आणि स्वतःसाठी आनंद साजरा करण्याची संधी मिळाली.महिला सशक्तीकरणासाठी पुढील टप्प्यांवर अधिकाधिक सकारात्मक उपक्रम राबवण्याचा निर्धार करण्यात आला.
या कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. रायगड पोलीस विभागाच्या या पुढाकाराबद्दल मी त्यांचे आभार मानते. महिलांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांना सक्षम करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र काम करूया!