बुलढाणामहाराष्ट्र

“संडे ऑन सायकल” मोहीमचे आयोजन

B1न्यूज मराठी नेटवर्क

बुलडाणा : दि. 3 : क्रीडा व युवक कल्याण मंत्रालय व जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत रविवार दि. 2 मार्च रोजी सकाळी येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे सायकल मोहीमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहीमेत जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राचे खेळाडू, शारदा ज्ञानपीठ, सहकार विद्या मंदिर, एडे्ड हायस्कूल व बुलढाणाकरांनी उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते. यावेळी “‍‍फिटनेस का डोस, आधा घंटा रोज” घोषणा देत तंदुरुस्तीचे संदेश देण्यात आले.

खेलो इंडिया योजनेच्या फीट इंडीया उपक्रमातंर्गत व पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांच्या आवाहनानुसार निरोगी राष्ट्राच्या उभारणीस नियमीत शारीरीक व्यायाम व खेळाचे महत्व जनतेला कळण्याच्या उद्देशाने “संडे ऑन सायकल” ही मोहीम देशभरात राबविण्याबाबत आले होते. या मोहीमेला बुलढाण्यातील जेष्ठ महिला तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी बी.एस.महानकर, क्रीडा अधिकारी आर. आर. धारपवार, महाराष्ट्र राज्य क्रीडा मार्गदर्शक उज्वला लांडगे, क्रीडा अधिकारी एस. एस. केळे व राज्य क्रीडा मार्गदर्शक डॉ. जे. डब्ल्यू. मोहोड यांनी हिरवा झेंडा दाखवून सायकल मोहीमेला रवाना केले.

सायकल मोहीम जिल्हा क्रीडा संकुल- छत्रपती श्री. शिवाजी महाराज मंदिर – आय.टी.आय. रोड ते जिल्हा क्रीडा संकुल या मार्गाने सायकल मोहीमेचे आयोजन करण्यात आले. मोहीमे दरम्यान “‍फिटनेस का डोस, आधा घंटा रोज” या घोषवाक्याने सायकल मोहीमेची सुरुवात करण्यात आले. तसेच सायकल मोहिमेमधून नागरी वस्तीमध्ये शारीक तंदुरुस्ती महत्तवाची असल्याचे संदेश विद्यार्थ्यांकडून देण्यात आले. सायकल मोहिमेच्या आयोजनासाठी जिल्हा क्रीडा कार्यालयातील सर्व अधिकारी तसेच भीमराव पवार, कृष्णा नरोटे, सुहास राऊत, प्रेम सोनुने, अर्जुन राऊत यांनी सायकल मोहीमेचे यशस्वी आयोजन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button