क्षयमुक्त भारत करण्यात खाजगी वैद्यकिय तज्ञांचे योगदान मोलाचे राहील- आरोग्य मंत्री मा.ना. प्रकाश आबिटकर

गारगोटी येथे खाजगी वैद्यकिय व्यावसायिक तज्ञांची कार्यशाळा संपन्न
B1न्यूज मराठी नेटवर्क
कोल्हापूर : सन २०२५ अखेर क्षयमुक्त भारत करण्यात खाजगी वैद्यकिय तज्ञांचे योगदान मोलाचे राहील. असे मत आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री कोल्हापूर मा. नामदार प्रकाश आबिटकर यांनी मांडले.
गारगोटी येथे आयोजित जिल्हा क्षयरोग केंद्र, कोल्हापूर व तालुका आरोग्य कार्यालय, भुदरगड यांच्या मार्फत आयोजित १०० दिवसीय क्षयरोग मोहीम अंतर्गत खाजगी वैद्यकिय तज्ञांच्या कार्यशाळेत अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.
यावेळी बोलताना पुढे मा. ना. आबिटकर म्हणाले की, आरोग्य विषयक धोरण ठरविण्यासाठी उद्देश व अडचणी समजून घेण्यासाठी खाजगी वैद्यकिय तज्ञांशी नियमित संवाद साधणे आवश्यक आहे. क्षयरोग कार्यक्रम हा टार्गेटेड कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व क्षयमुक्त देश, राज्य, जिल्हा क्षयमुक्त करण्यासाठी खाजगी वैद्यकिय तज्ञांनी सर्वतोपरी योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच बॉम्बे नर्सिंग एक्ट, नवीन वैद्यकिय अधिकारी भरती, महात्मा फुलेजन आरोग्य योजना, राज्य रक्त संक्रमण परिषद नियमावली याबाबत ही त्यांनी यावेळी माहिती दिली.
या कार्यक्रमास आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री कोल्हापूर मा.नामदार प्रकाश आबिटकर, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुप्रिया देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ.अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.हर्षला वेदक, सहायक संचालक (कुष्ठरोग) डॉ. हेमलता पालेकर, वैद्यकिय अधिक्षक गारगोटी उप.जि,रुग्णालय डॉ.पल्लवी तारळकर, वैद्यकिय अधिक्षक आजरा ग्रा.रु. डॉ.अमोल पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत परुळेकर, डॉ. मिलिंद कदम, अध्यक्ष आय.एम.ए. भुदरगड, डॉ.राजीव चव्हाण, अध्यक्ष निमा भुदरगड डॉ. सचिन सुतार, डॉ.माधव ठाकूर, काजल देसाई, प्रदीप कुपटे, आरोग्य पर्यवेक्षक, व्ही. एस कांबळे, एस.डी.राजगिरे, आरोग्य सेवक, एस. के. चिखले, लेखापाल संतोष घराळ, डेटा ऑपरेटर मेघना पंडित, कु.नम्रता पाटील, विजय प्रधान,ओंकार जाधव,जावेद मुल्ला, एकनाथ पाटील उपस्थित होते.
या कार्यशाळेस १४२ डॉक्टर्स उपस्थित होते. यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.हर्षला वेदक यांच्या नियोजनानुसार डयापको-दिशा व स्वयंसेवक यांच्या टीबी-एच.आय.व्ही. एकत्रित टीमने क्षयरोग जनजागृती पथनाटय सादर केले. डॉ.रविद्र पारकर, डॉ.बिपिन गोंजारी, डॉ.मूकुंद चौगले, यांनी २०२४ मध्ये उत्कृष्ट नोटीफिकेशन केलेबद्दल त्यांचे अभिनंदन केले. प्रास्ताविक डॉ. चंद्रकांत परुळेकर यांनी केले. सूत्रसंचालन श्री.सचिन चिखले यांनी केले तर आभार डॉ.अमोल पाटील यांनी मानले.
जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ.अनिरुद्ध पिंपळे यांनी सर्व खाजगी आरोग्य संस्था यांनी बॉम्बे नर्सिंग एक्ट नुसार दरपत्रक लावावे, तक्रार पेटी ठेवावी. तसेच खाजगी वैद्यकिय व्यावसायिकांनी क्षयरुग्णाचे नोटीफिकेशन करावे असे आवाहन केले.
अध्यक्ष आय.एम.ए. भुदरगड, डॉ.राजीव चव्हाण यांनी सर्व आरोग्य विषयक कार्यक्रमामध्ये खाजगी वैद्यकिय व्यावसायिकांचे शासकिय आरोग्य यंत्रणेला कायम सहकार्य राहील अशी ग्वाही दिली.
या कार्यशाळेत वैद्यकीय अधिकारी डी.टी.सी. डॉ.माधव ठाकूर, यांनी नोटीफिकेशन, अत्याधुनिक क्षयरोग निदान व उपचार प्रणाली, साय-टीबी, क्षयरोग प्रतिबंधात्मक उपचार (टी.पी.टी.), पोषण आहार योजना, खाजगी वैद्यकीय व्यवसायिंकांना प्रोत्साहनपर भत्ता, निक्षय मित्र, टी.बी. केअर, प्रीझम्टीव्ह नोंदणी, निक्षय प्रणाली, क्षयरोग शासकीय योजना याबाबत विस्तृत माहिती दिली.
या कार्यशाळेत सहायक संचालक (कुष्ठरोग) डॉ. हेमलता पालेकर यांनी कुष्ठरोग निदान व उपचार प्रणाली, कुष्ठरोग शासकीय योजना याबाबत माहिती दिली.